आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी.

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०८:- बांदा येथिल प्रसिद्ध असलेल्या जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.या सोहळ्यानिमित्त
चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असून आदल्या दिवशी गुरूवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ झाला. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक सुरु होता.यासाठी बाहेर विहिरीतून पाणी काढून स्वयंभू लिंगावर थेट अभिषेकासाठी सकाळपासुन भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.सकाळी 8 वा.शिवलिलामृत ग्रंथाचे साखळी पारायण आरंभ झाले.यात ग्रंथ वाचनात अनेक भाविकांनी सहभाग घेतला.
सायं 3.30 ते 8.30 या वेळेत विविध भजनी मंडळांची भजने तसेच रात्री मंदिराभोवती श्रींच्या सवाद्य पालखी प्रदक्षिणा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.शनिवार दि. 9 मार्च रोजी सायं 5 वाजता श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील.श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल.त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणाकरून व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल.यावेळी महाआरती करण्यात येईल.त्यानंतर 9 वाजता
नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगांव सावंतवाडी यांचा श्री संत सद्गुरु देवावतारी बाळुमामा हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे.सोमवारी दि.11 मार्च रोजी श्रींची साप्ताहिक पालखी फेरी होईल.तर बुधवार दि.13 मार्च रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होणार आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!