पोलिसांविरोधातच चोरीची फिर्याद दाखल
*🛑पोलिसांविरोधातच चोरीची फिर्याद दाखल*
*🛑गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेतली होती बंदूक : सावंतवाडी पोलीस ठाण्यातूनच बंदूक झाली गायब*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०८*:-गुन्हयाच्या तपासकामी सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली एक बारा बोअर सिंगल बॅरल बंदूक गायब झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या पेक्षाही अधिक धक्कादायक माहिती ही की, ही बंदूक पोलिसांनीच चोरल्याचा स्पष्ट आरोप करीत, त्या बंदुकीचे मालक रवींद्र बाबली गावकर यांनी याबाबत सावंतवाडी पोलीस स्थानकाप्त रितसर तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सावंतवाडी पोलीस मात्र चक्रावून गेले आहेत. सिंधुदुर्गच्या पोलीस इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
ओटवणे येथील फिर्यादी रवींद्रनाथ गावकर यांचे वडिल (कै.) बाबली गुणाजी गावकर यांच्या मालकीची अधिकृत परवाना असलेली १२ बोअर सिंगल बॅरल बंदूक सावंतवाडी -पोलिसांनी एका गुन्हयाच्या तपासकामी २००१ मध्ये गुन्हा रजि. नं. ६/२००१ अंतर्गत – तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक पांचाळ – यांच्याकडे जमा केली होती. या गुन्हयाचा अंतिम निकाल सुद्धा २००८ मध्ये लागला. – २००८ नंतर फिर्यादी रवींद्रनाथ गावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक रितसर अर्ज करीत आपल्या वडिलांच्या नावे असलेला बंदूक परवाना ते मयत झाल्याने वारस म्हणून आपल्या नावे करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांनी जप्त केलेली बंदूकही आपल्या नावावर होऊन ती ताब्यात मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीस अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी व सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी रवींद्रनाथ यांना बंदूक परवाना मंजूर केला व त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली बंदूक फिर्यादी रवींद्रनाथ यांच्या नावे केली. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिकृतपणे तसा आदेशही पारीत केला. दरम्यान, हा परवाना मंजूर होताच रवींद्रनाथ यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या बंदुकीची रितसर मागणी केली असता सावंतवाडीचे पोलीस निरिक्षक आर. बी. अधिकारी यांनी सदर बंदूक ही आपल्या ताब्यात नसून ती सावंतवाडी न्यायालयाच्या ताब्यात असल्याचे पत्र रवींद्रनाथ यांना दिले रवींद्रनाथ यांनी याबाबत सावंतवाडी दिवाणी न्यायालयात चौकशी केली असता सावंतवाडी पोलिसांनी ती बंदूक आपल्याकडे जमाच केलेली नसल्याचे लेखी कळवण्यात आले. दरम्यान, सावंतवाडी पोलीस व सावंतवाडी दिवाणी न्यायालयाच्या या पत्रांमुळे बंदुकीचे मालक रवींद्रनाथ पुरते चक्रावून गेले. अखेर त्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये ज्या कॉन्स्टेबलने ही बंदूक ताब्यात घेतली होती, तो कॉन्स्टेबल आणि अज्ञाताविरुद्ध आपली बंदूक चोरल्याची रितसर तक्रार सावंतवाडी पोलिसात दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

