कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदूर्गात सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात घट – API अमित गोते

*🛑राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदूर्गात सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात घट – API अमित गोते*

*🛑सिंधुदुर्ग पोलिसांकडून १७ हजार विद्यार्थ्यामध्ये जनजागृती केल्याचा दावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०७*:-राज्यात सर्वच ठीकाणी सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सिंधुदूर्गात मात्र या गुन्ह्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे सिंधुदूर्ग सायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १७ हजार विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करण्यात आल्यामुळेच ही संख्या घटली असा दावा सिंधुदूर्ग सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित गोते यांनी आज येथे केला.यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले,अर्चना घारे, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सिंधुदुर्ग जिल्हा डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, व्याख्याते रुपेश पाटील, महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर आदी उपस्थित होते.दरम्यान या ठीकाणी जिल्ह्यातील विशेषतः तरुणाईने साथ दिल्यामुळे प्रोनोग्राफी कींवा फोन करुन अश्लील व्हीडीओ बनविणे त्याच बरोबर ऑनलाईन गंडा या सारखे प्रकार आम्ही कमी करू शकलो असे ही त्यांनी सांगितले
सावंतवाडी येथिल महेद्रा अ‍ॅकेमडमीच्या माध्यमातून आज नव्याने झालेल्या अधिकार्‍यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार वर्षभरापुर्वी जिल्ह्यात अशा प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड वाढले होते तसेच तरुणाईला अडचणीत आणणार्‍या अनेक घटना घडल्या होत्या याचे वाढते प्रमाण लक्षात घेता आम्ही सिंधुदूर्ग पोलिस म्हणून जिल्ह्यातील तरुणाई मध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला या पार्श्वभूमिवर पोलिसांनी प्रत्येक महाविद्यालय आणी कॉलेज मध्ये जावून तेथिल तरुणाईला जागृत करण्याचे काम केले त्याच मुळे राज्यात अन्य ठीकाणी या प्रकाराचा आकडा वाढत आहे परंतू सिंधुदूर्गात मात्र हे प्रकार कमी झाले आहेत या मध्ये सिंधुदूर्ग सायबर सेलचा मोठा वाटा आहे.ते पुढे म्हणाले याठीकाणी विद्यार्थ्यानी आपल्या तरुणाईच्या काळात अशा गोष्टी पासून लांब राहणे गरजेचे आहे मोबाईल ही दुधारी तलवार आहे त्याचा फायदा आपल्याला होवू शकतो आणी तोटा ही त्यामुळे ते हत्यार योग्य पध्दतीने हाताळणे गरजेचे आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!