कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

शासनाकडून गड, किल्ल्यांसाठी भरीव निधींची तरतूद – मोंडकर

*🛑शासनाकडून गड, किल्ल्यांसाठी भरीव निधींची तरतूद – मोंडकर*

*🛑सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना श्रेय!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०५*:-कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे उपलब्ध निधीतून जिल्हयातील जास्तीत जास्त गड-किल्ले पुनरुज्जीवित करून जिल्हयाच्या बारमाही पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महासंघाचे कोकण अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्षे पेक्षा जास्त काळ लोटूनही स्थानिक पातळीवर हा भाग पर्यटनदृष्ट्या विकसित झालेला नाही परंतु गेल्या वर्षभरात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्हयाच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन व राज्य सरकार सकारात्मक असल्याचा अनुभव जिल्हावासियांना येत आहे. यातही महत्वपूर्ण आणि आनंदाची गोष्ट म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाने गड-किल्ले विकासासाठी ‘हेड’ बनवून त्या माध्यमातून राज्यातील गड- किल्ले विकसित करण्याचा संकल्प केला आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पात ११ विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करू दिला आहे. त्याचे सर्व श्रेय पालकमंत्री चव्हाण यांचे असल्याचे मोंडकर यांनी सांगून कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ त्यांचे आभार मानतो. याकामी सहकार्य करणारे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचेही पर्यटन महासंघाने आभार मानले. या माध्यमातून जिल्हयाच्या गड-किल्ले विकासासाठी निधी प्राप्त होणार असून जिल्हयातील ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे. पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून यापूर्वीच जिल्हयातील राजकोट किल्ला दोन महिन्यांत (ओसाड अवस्थेत असलेला कुठलेही जुने अवशेष शिल्लक नसताना) पुनरुज्जीवित करून या ठिकाणी जिल्हयातील ३२ गड-किल्ल्यांवरील विधीवतपणे माती आणून या गडावर उभ्या केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या फाऊंडेशनमध्ये कलश स्थापित केला. नौसेना दिनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. किल्ल्याला एक लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिल्याचे मोंडकर यांनी स्पष्ट केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!