नळकनेक्शन देत नसल्याने महिलेचा उपोषणाचा इशारा
*🛑नळकनेक्शन देत नसल्याने महिलेचा उपोषणाचा इशारा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴चौके, दि-०५*:-दहा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत नळकनेक्शन देत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा चौके भवानीनगर येथील • राजश्री गणेश चौकेकर यांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी सरपंचांना दिले आहे. सौ. चौकेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मी मागासवर्गीय चर्मकार समाजातील महिला असून चौके येथे माझे घर क्र. ७५३ आहे. या घराला गेली १० वर्षांपासून वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून नळकनेक्शन दिले गेले नाही. मला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जलजीवन मिशनअंतर्गत लागेल त्याला नळकनेक्शन द्यायचे आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच चौके ग्रामपंचायत चौके यांना पत्र देऊन त्वरित नळकनेक्शन देण्याविषयी यापूर्वी पत्रं दिलेली आहेत. दूरध्वनीवरून ग्रामसेवक पाटील यांना वारंवार सूचना देऊन सांगितले आहे. तसेच जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षांनी पाठपुरावा केलेला आहे. तरीही चौके ग्रामपंचायतीने पाणी नाकारले आहे. याबाबत आमदार वैभव नाईक व खासदार विनायक सऊत यांनीही ग्रा.पं.ला सूचना केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

