कुडाळ मालवण मतदारसंघातील वातावरण डॉ निलेश राणे यांना पोषक…
*🛑 कुडाळ मालवण मतदारसंघातील वातावरण डॉ निलेश राणे यांना पोषक..*
*🛑 डॉ निलेश राणे यांचा कार्यकर्त्यांच्या साथीने डोअर टू डोअर प्रचारावर भर..*
*🛑 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा झालेला पराभव भरुन काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०२:-* माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या कुडाळ मालवण मतदारसंघातील प्रचाराला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदार स्वतःहून डॉक्टर निलेश राणे यांच्याशी हितगुज केल्यावर आपल्याशी बोलून समाधान वाटल्याची भावना व्यक्त करीत आहेत.
ऐन उमेदीच्या काळात राजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले डॉक्टर निलेश राणे यावेळी कुडाळ -मालवण मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार आहेत, पहिल्यांदा सत्ताधारी राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांचा दहा वर्षाचा कार्यकाल :मतदारांनी अनुभवला असल्याने सत्ताधारी आमदारांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झालेले मतदार,त्यांची असलेली नाराजी,शिवसेनेत पडलेली उभी फूट, यावेळी भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
मागच्या वेळी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात रणजीत देसाई यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्यात आले व ते अवघ्या नऊ हजार मतांनी पराभूत झालेत, आता तर बरेच पाणी पुला खालून गेले आहे, त्यामुळे कुडाळ मालवण मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची असलेली पकड,डॉक्टर निलेश राणे यांच्यासोबत असलेली युवाई ,शिवसेनेतील उभी फूट,निवडणूकीच्या वेळी होणारे पक्षांतर यामुळे ही निवडणूक डाॅ निलेश राणे यांना सोपी जाईल असे जाणकारांचे मत आहे, त्या दृष्टीने डॉक्टर निलेश तयारीला लागले असून आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालत थेट मतदारांमध्ये मिसळल्यामुळे दिलदार ,खऱ्या, सच्चा ,निलेश राणे यांची ओळख मतदारांना होत आहे, याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होईल असे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवतात.
त्यांच्या मतदारसंघातील ठराविक जनतेशी संपर्क साधला असता कुडाळ- मालवण मतदारसंघात झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे, त्यामुळे तो पराभव भरून काढण्यासाठी यावेळी डॉक्टर निलेश राणे यांच्या पाठीशी कुडाळ -मालवण मतदारसंघातील मतदार ठामपणे उभे राहतील असा विश्वास काही मतदारांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल शी बोलताना व्यक्त केला आहे .त्या दृष्टीने मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा च़ंग डॉक्टर निलेश राणे यांनी बांधला असून आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीने ते डोअर टू डोअर प्रचारावर जोर देत आहेत, एकंदरीत मतदारसंघाचा कानोसा घेतला असता सध्याचे वातावरण भाजपच्या किंबहुना डॉ निलेश राणे यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

