आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 वेत्येतील बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आढळला आरोंदा खाडीपात्रात..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२५:- वेत्ये-नमसवाडी (ता. सावंतवाडी) मृत येथून बेपत्ता झालेल्या ७० वर्षीय वृद्ध महिला आरोंदा-शिपेतूवाडी येथील खाडीपात्रात मृतावस्थेत आढळून आली. प्रेमलता मनोहर गावडे असे तिचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी आपण भटजींकडे जाते, असे आपल्या पुतण्याच्या पत्नीला सांगून गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही, म्हणून तिचे नातेवाईक तिचा शोध घेत होते. शुक्रवारी रात्री आरोंदा-शिपेतूवाडी येथील खाडीपात्रात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह तेथील ग्रामस्थांच्या नजरेत पडला. तात्काळ याची माहिती ग्रामस्थांनी पोलीस पाटील समीर केरकर यांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सावंतवाडीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता गायकवाड, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्यासह पोलीस बाबुराव जाधव, प्रदीप नाईक, महिला पोलीस श्रीम. कदम यांनी खातरजमा केली. मात्र, महिलेची ओळख पटली नव्हती. वेत्ये येथील ग्रामस्थांना खाडीपात्रात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच तेथे जाऊन खातरजमा केली. त्यावेळी सदर मृतदेह हा बेपत्ता प्रेमलता गावडे हिचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या बाबत पोलीस पाटील केरकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्युची नोंद केली. पोलिसांना मयत वृद्धेच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबात मयत प्रेमलता गावडे हिच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर प्रेमलता गावडे ही दोन वर्षांपासून आजारी होती. सततच्या आजाराचे कारण शोधण्यासाठी भटजींकडे जाते, असे आपल्या घरातील नातेवाईकाला सांगून ती गेली. ती घरी परतली नाही. आजाराला कंटाळून वृद्ध महिलेने खाडीपात्रात आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!