आंबोलीत शासनाच्या जागेवर सेकंड लवासा, बेकायदा बांधकामे त्वरीत जमीनदोस्त करा -खा, विनायक राऊत*
*🛑आंबोलीत शासनाच्या जागेवर सेकंड लवासा, बेकायदा बांधकामे त्वरीत जमीनदोस्त करा -खा, विनायक राऊत*
*🛑महसुली व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तातडीने कारवाई करावी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२४*:-आंबोली हिरण्यकेशी परिसरात उभारण्यात येणारी “रिसॉर्ट” वजा बांधकाम हे सेकंड लवासा आहे. स्थानिकांच्या जमीनी बळकावून कोण पैशाच्या जोरावर दादागिरी करत असेल तर ती दादागिरी आम्ही निश्चितच उतरवू त्यामुळे वन आणि महसुलने योग्य ती दखल घेवून तात्काळ हे बांधकामे जमीनदोस्त करावी, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिला.
दरम्यान अनिर्णीत वनजमिनीत बांधकाम करणाऱ्या तसेच त्या बांधकामाला परवागनी देणाऱ्या व वीज पुरवठा करणाऱ्या संबंधित विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करुन सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच ग्रामपंचायतीच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविण्यात यावा, अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
हिरण्यकेशी येथे परप्रांतीयाकडुन सुरू असलेल्या रिसॉर्ट आणि बांधकामच्या विरोधात तेथील ग्रामस्थांनी आज दहाव्या दिवशी आपले आंदोलन सुरू केले आहे. त्याला श्री. राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.
यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, बाळा गावडे, आबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी श्री. राऊत यांनी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना घेवून परिसराची पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी वनजमिनीत चुकीच्या पध्दतीने बांधकाम उभे करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याबाबत श्री. राऊत यांनी प्रस्तुत वन व महसुलच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित बांधकाम हे चुकीच्या पध्दतीने उभारण्यात आलेले आहे. त्याला कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही.त्यामुळे संबंधित बांधकाम तात्काळ पाडून टाकण्यात यावेत, तसेच शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली.
यावेळी श्री. राऊत यांनी त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी बाहेरुन आलेल्या दलाल या ठिकाणी नकोच, अशी भूमिका तेथील ग्रामस्थांनी लावून धरली तर आंबोली आमची आहे आणि आमचीच राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे तेथे जमलेल्या महिला भगिनींकडुन सांगण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी असलेले वनविभागाचे अधिकारी नवकिशोर रेड्डी, तहसिलदार श्रीधर पाटील व अन्य अधिकाऱ्यांशी विजअधिकारी यांच्याशी राऊत यांनी चर्चा केली. आणि येत्या दहा दिवसात योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने या आंदोलनाला उत्तर देवू, असा इशारा दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

