रमेश असगणकरचा जामीन अर्ज नामंजूर
*🛑रमेश असगणकरचा जामीन अर्ज नामंजूर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२२*:-एका महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी रमेश दत्ताराम असगणकर (६०) ता. कुडाळ याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी नामंजूर केला आहे.सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत रमेश याने आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आपण गर्भवती असल्याचे समजताच तालुक्यातील एका दवाखान्यात नेत गर्भपात करवून घेतला होता. अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने पोलिसात दिली होती. त्यानुसार रमेश असगणकर याच्यावर पोलिसांनी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करुन अटक केली होती. एक दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर ९ रोजी कुडाळ न्यायालयाने त्याला न्यायालयीस कोठडी मंजूर केली होती.मागील १० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीत त्याने गर्भपातासारखे कृत्य केल्याची बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. तो जामिनावर सुटल्यास फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता असल्याची बाब सरकार पक्षाकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

