कारिवडे सिद्धयोगी महापुरुष मठ भंडारा उद्या
*🛑कारिवडे सिद्धयोगी महापुरुष मठ भंडारा उद्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२२*:-कारिवडे-गोसावीवाडी येथील सिद्धयोगी महापुरुष मठाचा भंडारा उत्सव शुक्रवार २३ फेब्रुवारीला होत आहे. कोकणात ठराविक ठिकाणी असलेल्या गोसावी नाथपंथी सिद्धमहापुरुष मठापैकी असलेल्या या मठाच्या भंडारा उत्सवासाठी जिल्ह्यासह बेळगाव, कोल्हापूर भागातून हजारो भाविक उपस्थित राहतात.सिद्धयोगी महापुरुषाचा हा प्राचीन मठ असून येथे नाथपंथी समाजाची संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते. हा नाथपंथीय मठ डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात असून हे एक जागृत देवस्थानही मानले जाते. या उत्सवानिमित्त मठात गुरुवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून नाथसंप्रदायांच्या विधीनुसार पूजा मांड घालून मंत्रतंत्र म्हणून घट स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सिद्ध महापुरुषाच्या दर्शनासह नवस बोलणे व फेडणे यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होते. रात्री १०.३० च्या सुमारास ग्रामदैवत कालिका देवीच्या अवसार, मंदिरातून उत्सवमूर्तीसह अब्दागीर, निशाणकाठी, तरंग सवाद्य पालखी सिद्ध महापुरुषाच्या समाधीकडे रवाना होणार आहे. शेकडो भाविकांच्या या सवाद्य पालखी मिरवणुकीचे सिद्ध महापुरुष, मंदिराकडे आगमन झाल्यानंतर प्रथम महिला औक्षण करतात. त्यानंतर सिद्ध महापुरुष आणि कालिका मातेच्या अविस्मरणीय भेटीचा ‘याची देही याची डोळा’ क्षण पाहून हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. मध्यरात्री १२ वाजता भंडारा उत्सव झाल्यानंतर रखवालीसाठी गाऱ्हाणे घालण्यात येते. त्यानंतर ओटवणे येथील दशावतारी कलाकारांचे नाटक होणार आहे. त्यानंतर या भंडारा उत्सवातील महत्वपूर्ण प्रसाद अर्थात ‘सांदणी’ कारिवडे तसेच ओटवणे देवस्थानच्या मानकऱ्यांसह सावंतवाडी येथील सावंत-भोसले राजघराण्याला देण्यात येतो. उत्सवाची सांगता नाथसंप्रदायातील परंपरांचे पालन करून होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

