कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 ‘5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..’; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२२:- शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीदरम्यान अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरुन वाद झाल्याचं दिसून आलं आहे.आता पुन्हा या दोघांमधील बेबनाव जाहीरपणे समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झळकलेल्या एका पोस्टरमुळे दोघांमधील वाद सध्या चर्चेत आला असून हे पोस्टर्स भाजपाकडून लावण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवृत्तीचा सल्ला दणारे बॅनर्स बुधवारी वेंगुर्ल्यात झळकले. केवळ शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी हे बॅनर्स झळकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पोलिसांनी तातडीने हे बॅनर्स हटवले. मात्र तोपर्यंत या बॅनर्सचे फोटो आणि चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली. या प्रकरणावर केसरकरांनीही प्रतिक्रिया नोंदवताना, आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने इच्छुक ‘टिल्लू-पिल्लू’ घाबरलेत, असं म्हटलं. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण, भोगवे आणि परूळे भागामध्ये झळकले हे बॅनर्स कोणी लावले याची ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या बॅनर्सवर मालवणी भाषेतून केसरकरांना टोला लगावण्यात आलेला.

काय मजकूर होता या बॅनर्सवर

 

या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेत, “भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता…!! 5 वर्षात जसा आमका तोंड धाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका..” असं लिहिलेलं होतं. तर अन्य एका बॅनवर, “मागच्या निवडणुकीत 2 हजार पोरा-पोरींना नोकरी देतालास असा सांगितलं, 5 वर्षांत एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय, पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास,” असा टोला लगावला आहे. “तुम्ही हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स त्याचबरोबर स्थानिकांना हॉटेल, पालक अनुदान पर्यटनातून रोजगार अशा गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही खुश झालो होतो. त्यानंतर मतं घातली, परंतु तुमची हाऊस बोट काय आमच्या दर्यात पोचाक नाय,” असं वाक्यही बॅनरवर होतं.बॅनर्सवरील मजकूर जसाच्या तसा

 

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

 

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्च्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

 

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

 

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.

या बॅनर्समागे कोण?

 

केसरकर यांनी थेट नाव न घेता या प्रकरणाचं खापर महायुतीमधील नेत्यांवरच फोडलं. मात्र हे असले प्रयत्न यशस्वी होणार नाही असंही केसरकर म्हणाले. केसरकरांच्या बोलण्याचा रोख हा भाजपाचे विधानसभा निवडणूक क्षेत्र प्रमुख तसेच माजी आमदार राजन तेलींच्या दिशेने असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. केसरकरांनी मागील निवडणूक तेलींविरोधातच लढवून जिंकली होती. केसरकर 15 हजार मतांनी जिंकले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा करत असल्याने विधानसभेसाठीही भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून अशाप्रकारचं राजकारण सुरु असल्याने शिंदे गटामध्ये नाराजीचं चित्र दिसत आहे.

 

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

 

 

——————————————–

 

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

 

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴

💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004

9420293799

7768898659

758857058

9422874647

______________________________

🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!