सबळ पुरावे डोळ्यासमोर असताना वेंगुर्ला पोलीस दिक्षा चौकेकर मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला कोणता मुहुर्त शोधत आहेत
*🟥सबळ पुरावे डोळ्यासमोर असताना वेंगुर्ला पोलीस दिक्षा चौकेकर मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला कोणता मुहुर्त शोधत आहेत*
*🟥घटनास्थळावरील वस्तुस्थिती हा घातपात असल्याचे ओरडून सांगत असताना गुन्हा दाखल करायला पोलिसांच्या हाताला लकवा मारलाय का?*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 संपादकीय :सिताराम गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.१६*:-वेंगुर्ले उभादांडा येथील रहिवासी सौ दिक्षा चौकेकर आत्महत्या प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे,घटनास्थळावरील एकंदरीत वस्तुस्थिती पाहिली असता ती आत्महत्या नसून घातपात असल्याचे ओरडून सांगत आहे,ज्या रसीने दिक्षा ने आत्महत्या केली असे सांगितले जात आहे,ती कपडे वाळत टाकण्यासाठी असलेली बारीक नायलाॅन रसी आहे,व ज्या ठिकाणी दिक्षाने आत्महत्या केली असे भासवले जाते ती उंची सुमारे पंधरा फूट आहे व पायाखालचे टेबल दिड फूट मग एवढ्या उंचीवर रसी टाकून तीने गाठ कशी मारली? तीला गळफासावरुन तीचा पुतण्या व जावेने खाली उतरवीले त्यावेळी तीचा मृतदेह मागच्या मागे पडून डोके फुटले असा युक्तिवाद केला गेला आहे,मुळात डोके फुटले तर रक्तं येणारच जखम पण मोठी मग रक्त गायब कसे झाले, अंगावरील गाऊन वर रक्त कसे नाही,जर कपडे बदलले तर ते कुठे आहेत? गळफास लावलेली रसीचे तीन तुकडे कसे? वरच्या बाराला दोरीची गाठ पडल्या शिवाय गळफास लागू शकतो का?वरची गाठीशी रसी गायब कशी?या सर्व प्रश्नांची उकल पोलिसांनी निपक्षपणे करने गरजेचे आहे असे आमचे मत आहे.
दिक्षा चौकेकर पुर्वाश्रमीची संगिता पेडणेकर यांना आम्ही अगदी जवळून ओळखतो,त्यांनी अनेक कठीण प्रसंगाला तोंड दिले पण कधी हताश झाली नाही ती लढवय्यी होती, त्यामुळे ती आत्महत्या करु शकत नाही असे आमचे ठाम मत आहे.विस्तार अधिकारी या उच्च पदावर असलेली व पदरी तेरा वर्षाचा मुलगा असताना ती आत्महत्या का करेल? जर आत्महत्या केली तर तीने पश्चात कोणाला त्रास नको म्हणून चिठ्ठी लिहून का ठेवली नाही? भिंतीवर असलेले हाताचे ठसे,पावलांचे ठसे कोणाचे? पोलिसांनी घटनास्थळ त्वरीत सिलबंद का केले नाही?मुलीच्या माहेरची मंडळी तीचे भाऊ टाहो फोडून आपल्या बहिणीचा घातपात झाला असे सांगत असताना पोलिस हातावर हात ठेवून का बसले? पोलिस निरीक्षक भोसले कोणाचे काही ऐंकण्याच्या मनस्थितीत का नव्हते? हा संशोधनाचा विषय आहे
दिशा चौकेकर दि ९-२-२४ रोजी आपल्या माहेरी सकाळी ९.३०ते १०.३० पर्यंतच्या वेळेत आपल्या आई भाऊ,वहिनींशी बोलून गेली होती तेव्हा ती कोणत्याही दडपणाखाली नव्हती मग तीने अकस्मात आत्महत्या का केली?ती माहेरी राहायला आली असताना तीला जबरदस्तीने वेंगुर्ले येथे का घेऊन गेलेत?नवरा बाजारात गेलाय हीच संधी साधून तीने आत्महत्या केली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.एखाद्या मृत्यूवर तीच्या रक्ताताच्या नात्यातील व्यक्तीने संशय व्यक्त केला की सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास होणे गरजेचे असताना पोलिस यंत्रणा कोणाच्या आदेशाने हातावर हात घेऊन बसली,या प्रकरणात कोण कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत होता हे ही स्पष्ट होणे गरजेचे आहे.
दिशा चौकेकर हिला कोणताही मानसिक आजार नसून शारिरीक आजार होता परंतू तीने गेली २० वर्षापासून आपल्या आजारावर मात करुन नोकरीत प्रमोशन मिळवून पं.स.वेगुर्ला येथे विस्तार अधिकार पदाचा कार्यभार सांभाळला होता.तीला एक लहान मुलगा असून ८ वी इयत्तेत शिकतो घरात मानसिक त्रास होऊनही तीने परिस्थितीशी सामना करुन १५ वर्ष संसार केलेला असताना दिशा हीला अचानक आत्महत्या का करावी लागली याचा तपास अद्याप पोलीसांकडून केला जात नाही यामागचे गौडबंगाल काय?पगार ए.टी.एम.पती लक्ष्मीकांत चौकेकर यांच्या तीने लग्न झाल्यापासूनच सोपविले होते पतीवर पूर्ण विश्वास ठेऊन तीने परिस्थितीवर मात करुन संसार सुरु होता.घरातील वातावरणाशी जुळवून घेत तीने अनेक खडतर प्रसंगाला तोंड देत आपल्या जीवनाचा प्रवास चालू ठेवलेला असताना कोणतेही कारण नसताना तीने केलेली आत्महत्या १००% संशयीत आहे.
पोलीस दबावाखाली दिशा चौकेकर संशयीत खून प्रकरण महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा संबधितांना वेळ देऊन एफ.आय.आर दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत असा आमचा आरोप आहे,
मेडीकल रिपोर्ट आल्याखेरीज एफ.आय.आर नोंदवून घेता येत नसेल तर लेखी द्या अशी मागणी वेगुर्ला पी.आय.भोसले यांचेकडे मयतीच्या भावाने केली असता तसे लेखी देता येत नाही अशी बेजबाबदार उत्तरे देणारे पोलीस अधिकारी सौ.दीशा चौकेकर संशयीत खून प्रकरणाचा छडा लावतील का? हा आमचा सवाल आहे?सौ.दिशा चौकेकर हीचे माहेर सावंतवाडीत असून कुंटुब मोठे प्रतिष्ठीत व सुशिक्षित तसेच सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यापैकी असताना मयत सौ दिशा चौकेकर संशयित खून प्रकरणात पोलीस दबाखाली कार्यरत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेबाबत काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या मृत्यू प्रकरणात जर कोण प्रेताच्या टाळूवरील लोणी खात असेल तर तो नियतीच्या फेऱ्यातून सुटणार नाही.मयत दिक्षा चौकेकर हिच्या घातपाताचे सगळे पुरावे नष्ट करुन जर कोणी आत्महत्येचे लेबल लावण्याचा प्रयत्न करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी एकच निर्वाणीचा इशारा देत आहे या मागील सत्य काय ते शोधून काढा,अन्यथा भगवतांच्या काठीचा आवाज होत नाही,त्याचा मार मात्र बसणारच..
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

