आंबोली ग्रामसभेत अतिक्रमण करून घरे बांधल्या प्रकरणी कारवाईचा ठराव
*🟥आंबोली ग्रामसभेत अतिक्रमण करून घरे बांधल्या प्रकरणी कारवाईचा ठराव*
*🟥तत्कालीन तलाठी डवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 आंबोली, दि.१५*:-कबुलायातदार गावकर जमिनीत अतिक्रमण करून बाहेरच्या लोकांना घरे बांधून दिल्या प्रकरणी येथील ग्रामसभा वादळी ठरली.सुरुवातीला एका ग्रामस्थाने वादग्रस्त अर्ज दाखल केला त्याचे वाचन केल्याने मोठा गदारोळ झाला. वादावादी झाली.सभाध्यक्ष सरपंच यांनी अर्ध्या तासासाठी सभा तहकूब केली.नंतर सर्व दहा अर्जावर सविस्तर चर्चा झाली आणि अतिक्रमण विरोधात ठराव घेण्यात आले. तसेच तत्कालीन तलाठी डवरे याला निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी तसेच वनरक्षक पांडुरंग गाडेकर बरीच वर्षे येथे असून त्यांच्या संगनमताने ही अतिक्रमणे होत आहेत त्यामुळे त्याची तात्काळ बदली करावी आणि संबंधित वन अतिक्रमन पाडून टाकण्यात यावे.आंबोलीत ६५४ मूळ कुटुंब वगळता बाहेरच्या लोकांच्या अतिक्रमणवर कारवाई करावी असा ठराव घेण्यात आला.आंबोलीत बाहेरच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आणि काही दलालांनी या जमिनी विकून कोट्यावधी रुपये कमावले आणि गावातील लोकांना काही शिल्लक ठेवले नाही याबाबत आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा तीन वाजता सुरू झाली.अजेंड्याप्रमाणे वाचन सुरू झाले त्यात सुरुवातीला एक ग्रामस्थांने गावच्या चुकीच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त अर्ज दिला त्याच्या वाचन झाल्यानंतर मोठी वादावादी झाली. सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. यानंतर महिलांना पुढे बसवण्यात आले आणि सर्व दहा अर्जाप्रमाणे मोठी वादळी चर्चा झाली.आणि ठराव घेण्यात आले. यावेळी सर्व्हे क्रमांक ७१ मधील रायाचे भाटले येथे वनविभागाच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बाहेरच्या लोकांचे बंगले उभे राहत असून सध्या देखील कामे सुरू आहेत ती तात्काळ पाडून टाकण्यात यावी.संबंधित वनरक्षक हा दहा वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी असून त्याचे साठेलोठे असल्याने आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही इमारती उभ्या राहिल्या त्यामुळे तात्काळ त्याची बदली करावी.तेथील सर्व अतिक्रमणे हटवण्यात यावी.शासनाचे अतिक्रमण हटविण्याचे परिपत्रक असल्याने त्यानुसार कारवाई करावी. बाहेच्या लोकांचे पीक पाणी नोंद रद्द करावी. हिरण्यकेशी रस्ता येथे बाहेरच्या लोकांची अतिक्रमणे पाडून टाकण्यात यावी. घरक्रमांक रद्द करण्यात यावे.सैनिक स्कूल ने गावातील एकही विद्यार्थ्याला शिकवले नाही तसेच कर्मचारी घेतले नाही त्याचा गावाला काही उपयोग नाही त्यामुळे त्यांना गावची दिलेली ३५ एकर जागा रद्द करावी. लाकूड फाटा सरपण आणण्यासाठी गेलेल्या स्थानिक महिलांवर वनविभागाने कारवाई करतात तर बाहेरच्या लोकांची आतापर्यंत एवढी मजल जाऊन अतिक्रमणे केली आहेत.स्थानिकांना कोणताही त्रास वनखात्याने देऊ नये.बाहेरच्या लोकांना घरक्रमांक देऊ नयेत. सर्व्हे क्रमांक ९३ मध्ये अधिकार नसणाऱ्या व्यक्तीला १५ एकर चा नकाशा बनवून फेरफार करून देणाऱ्या तत्कालीन तलाठी श्री.डवरे याला निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी.त्याने घातलेल्या बोगस नोंदी रद्द कराव्यात.असे जमिनीबाबत ठराव घेण्यात आले.तसेच वरिष्ठ अधिकारी महसूल आणि वनखाते का कारवाई अजून करत नाहीत त्यासंबंधी ग्रामसभेचा ठराव पाठवावा.शासनाने तातडीने यासंबंधी कारवाई करावी असा ठराव घेण्यात आला. यावेळी सभागृह हाऊसफुल्ल होते बाहेर लोक उभे होते पुणे मुंबई येथूनही लोक आले होते ५०० च्या वर लोक या सभेला उपस्थित होते.सभाध्यक्ष सरपंच सावित्री पालेकर,ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी,मंडळ अधिकारी यादव,तलाठी सुमित घाडीगांवकर,वनपाल पूनम घाडगे तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, पोलिस पाटील विद्या चव्हाण तसेच सदस्य उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

