कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ल्यात १७ ग्रामदेवतांचे समुद्रस्नान

*🟥वेंगुर्ल्यात १७ ग्रामदेवतांचे समुद्रस्नान*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले,दि.१०*:-ढोल ताशांचा गजर, सनईचा सूर, सजवलेली पालखी, तरंग व रयतेच्या अमाप उत्साहात वेंगुर्ले सागरेश्वर, बागायत व आरवली, सागरतीर्थ, शिरोडा, रेडी येथे दाखल झालेल्या देवदेवतांनी शुक्रवारी सकाळपासून महोदय पर्वणीनिमित्त समुद्रकिनारी पवित्र स्नान केले. यानिमित्त या किनाऱ्यावर भाविकांचा महासागर उसळला. या अनुपम सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणच्या १७ गावांच्या ग्रामदेवता समुद्रस्नानासाठी वेंगुर्ले सागरकिनारी आल्या होत्या. गुरुवारी सायंकाळीपासून जिल्ह्यातील ग्रामदेवता आपल्या ठिकठिकाणच्या रयतेसह वाजत-गाजत पायी शहरात आल्या होत्या. या पालख्या येथील मंदिरे व ग्रामस्थांच्या घरी विसावल्या होत्या. रात्री देवजागर, भजन, नामस्मरण, भक्तांच्या संकटाचे शिवकळेद्वारे निवारण आदी कार्यक्रम विविध भागात आयोजित करण्यात आले होते. तर काही देवता शुक्रवारी सकाळी समुद्रस्नानासाठी वैगुर्व्यात आल्या. वेगुर्व्यातील भाविक, नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. समुद्रस्नानासाठी आलेल्या महिलांसाठी चेजिंग रुमची व्यवस्था केली होती. भटवाडी मित्रमंडळ, विशाल परब फाऊंडेशन व अन्य दानशूर लोकांकडून व संस्थांकडून लोकांसाठी अल्पोपहार, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.वाहातुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस तैनात होते. समुद्रात समुद्रात मच्छीमार बोटी, जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले होते.वेंगुर्ले सागरेश्वर व बागायत तीर्थक्षेत्री कुडाळ तालुक्यातील उपवडे, मांडकुली, बांबुळी,साळगांव, आंबडपाल तर सावंतवाडी तालुक्यातील पुळास, मठ येथील स्वयंभू वेंगुर्ले येथील रामेश्वर, सातेरी आदी देवदेवतांनी व त्यांच्यासोबत आलेल्या रयतेने महोदय पर्वणीनिमित्त अनुपम स्नानाचा लाभ घेतला तर आरवली समुद्रकिनाऱ्यावर शिरोडा, आजगांव, आसोली, मडुरा, कास येथील देवदेवतांनी व त्यांच्यासोबत आलेल्या रयतेने समुद्रस्नानाचा लाभ घेतला.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!