ठाणेमहाराष्ट्रराजकीय

🟥 ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवीन बॅनर्स

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ठाणे, दि-०९:- हातातील घड्याळ चोरलं; पण, मनगट आमच्याकडेच आहे ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. असे बॅनर बुधवारी ठाण्यात लावण्यात आले होते. त्यातच आता शरदचंद्र पवार गटाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी नवे बॅनर्स शहरात लावल्याचे दिसत आहे. त्याच्यावर चिन्ह तुम्हारा, ” बाप ” हमारा असा उल्लेख करून अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. यामुळे ठाणे शहरात पुन्हा एकदा बॅनर्स वॉर पाहण्यास मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिवसेना शिंदे गटाप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दिले आहे. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असा नवा गट तयार झाला आहे. त्यानुसार बुधवारी पक्षाच्या नावाचा बॅनर्स शहरात लावण्यात आले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवा बॅनर्स लावला आहे. या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला असून जीत तो आज भी हमारी हुई है !

चिन्ह तुम्हारा, ‘ बाप ‘ हमारा असे शब्दात अजित पवार गटावर निशाणा साधण्याचे काम केले आहे. बाप हा शब्द लाल अक्षरात आहे. तसेच त्याच्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यासह जिल्ह्यध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि अन्य एकाचे नाव आहे. या बॅनर्स ला आता अजित पवार गटाकडून काय उत्तर मिळते हेच पाहावे लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात सातत्याने सुरू असलेल्या या बॅनर्स वॉर ची सवय ठाणेकर नागरिकांना झाली आहे. मात्र अजित पवार गट या बॅनर्सला उत्तर देईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!