🟥 दोडामार्ग पोलिसांनी मध्यरात्री सापळा लावून घाटमाथ्यावर जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूसह २५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०९: – गेल्या काही वर्षांपासून गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे दारु दोडामार्ग येथील अनेक चोर वाट्यांनी मुख्य रस्त्यावरुन घाटमाथ्यावर तसेच बेळगाव, कोल्हापूर, चंदगड, तसेच इतर ठिकाणी नेली जाते. नानोडा गोवा, खोलपे गोवा तसेच इब्रामपूर गोवा या भागात दारु भरून दोडामार्ग हद्दीतून नेल्या जातात. अशाच प्रकारे दारु भरलेला टेम्पो दोडामार्ग येथून जाणार याची पक्की खबर दोडामार्ग पोलिसांना मिळताच दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात सापळा लावून राजी मध्यरात्री सांगोला सोलापूर येथे दारु भरून जाणारा टेम्पो अडवून तपासणी केली असता गोवा बनावटीची जवळपास दहा लाखांची दारु टेम्पो असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी दिली.
या कारवाईमुळे दारु माफियांचे धाबे दणाणले आहे. दोडामार्ग पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही पहिली कारवाई आहे. दोडामार्ग पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी मध्यरात्री दिड वाजता ही कारवाई केली. पोलिस विठोबा सावंत, दिपक सुतार, होमगार्ड, ताटे, खुटवळकर, ताटे, यांनी दोडामार्ग गांधी पिंपळेश्वर चौकात ही कारवाई केली. दोन जणांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक जयेश ठाकूर अधिक तपास करत आहेत. संशयीत यांनी या अगोदर दारु वाहतूक केली आहे काय? यामागे आणखी कोण आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

