अवैध दारू रोखण्यासाठी कडक कारवाई करा!

*🟥अवैध दारू रोखण्यासाठी कडक कारवाई करा!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०५*:-शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी आपल्या मागणीसाठी उपोषणाच्या दिलेल्या तक्रार अर्जाची दखल गृहविभागाने घेतली आहे. त्यांच्या मागणीनुसार बांदा चेकपोस्ट मार्गावरून होणारी अवैध दारू व मादक पदार्थ वाहतूक आणि संबंधित अवैध दारू वाहतूक व विक्रीत गुंतलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. सावंतवाडी पोलीस विभागाने गृहविभागाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुंज यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. गृह मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव यांनी आपल्या तक्रार अर्जाची दखल घेत ३० जानेवारीला उचित कार्यवाही करण्याचे लेखी आदेश गृहविभागाला दिल्याचे मुंज यांनी नमूद केले. बांदा पोलीस चेकनाक्यावरून पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूसह अमली पदार्थांची वाहतूक होत आहे. दारू वाहतूक करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे मारहाण, तोडफोड करून लोकांना धमकावण्याचे काम सुरू आहे संबंधित व्यक्तीविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तींवर तडीपारची कडक कारवाई करावी, अशी गृहविभागाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच बांदा पोलीस चेकपोस्टवरून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीला आळा घालावा. जे पोलीस अशा व्यक्तींना सहकार्य करतात, त्यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी २६ जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा मुंज यांनी दिला होता. परंतु या तक्रारींची चौकशी व कारवाई होण्यास अवधी मिळावा, यासाठी उपोषण स्थगित केले होते. सदर अर्जाची मंत्रालयाने दखल घेत संबंधित तक्रार अर्जानुसार उचित कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!