🟥 एम.के. सी. एल.ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे जिल्हास्तरीय यश..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०४:– जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. इयत्ता ५ वी ते ९ वी तील एस.एस.सी.बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘एम.के.सी.एल. ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२३ अर्थात ‘एम.ओ.एम.’ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आली होती.सदर परीक्षेसाठी राज्यभरातून २०००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावंतवाडीमधील सरकारमान्य एम.एस.- सी.आय.टी.केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल निरुखेवाडीचा, इयत्ता ५ वी चा विद्यार्थी ‘कु. वैष्णव उदय सावंत’ याने सहभाग घेतला होता. त्याने जिल्हास्तर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्याला शैक्षणिक भेटवस्तू , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल ‘कु. वैष्णव उदय सावंत ‘ या विद्यार्थ्याचे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले. तसेच, आनंदी कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. मेघश्याम काजरेकर, शालेय शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

