कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

कणकवलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा

*🟥कणकवलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा*

*🟥शिवसेना खा.विनायक राऊत यांची माहिती ;शिवसेना उबाठा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले ..*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴 कणकवली,दि.०३*:-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत.कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयासमोर ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली. येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आदी उपस्थित होते. कणकवलीत ४ फेब्रुवारी होणारी जाहीर सभा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेना उबाठा पक्षाकडून रणशिंग फुंकले जाणार असल्याचे मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला आहे. रविवारी ४फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता गांधीचौक सावंतवाडी येथे कॉर्नर सभा, कुडाळ जिजामाता चौक येथे कॉर्नर सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील. दुपारी ३ वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासन आणि मंदिर नूतनीकरणचा प्रारंभ ते करणार आहेत. त्यानंतर ५ वाजता आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन घेऊन सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी राजापूर धूतपापेश्वर मंदिरात दर्शन घेऊन रत्नागिरी आठवडा बाजार ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चिपळूण येथे जनतेशी संवाद साधणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!