शिरशिंगे गावच्या सुपुत्र नामदेव महादेव घावरे ह्यांना ऑर्नरी लेफ्टनंन्ट पद
सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी येथील भारतीय सेनेमध्ये कार्यरत असणारे श्री नामदेव महादेव घावरे यांना दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतीच्या द्वारे ऑर्नरी लेफ्टनंन्ट पद जाहीर झाले आहे.
नामदेव महादेव घावरे हयांची २५ जून १९९१ साली भरती झाली होती गेली ३ वर्ष सुभेदार मेजर ह्या पदावर कार्यरत आहेत.
श्री.नामदेव महादेव घावरे ह्यांना ऑर्नरी लेफ्टनंन्ट पद मिळाल्याबद्दल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्या बद्दल त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. त्याचा पद स्वीकार हा पुणे येथे होणार आहे.

