गोवेरीतील शाळा बंद आंदोलन सुरूच
*🟥गोवेरीतील शाळा बंद आंदोलन सुरूच*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.२५*:-गोवेरी येथील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळेतील प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या शिक्षकाला पुन्हा याच शाळेत पूर्ववत करावे, या मागणीसाठी पालकांनी सुरू केलेले शाळा बंद आंदोलन दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरू होते. शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा पालकांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आमची मागणी पूर्ण करावी, असे ग्रामस्थांनीही सांगितले. गोवेरीची ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून या शाळेत ६८ विद्यार्थी पटसंख्या आहे. मुख्याध्यापक व अन्य शिक्षक मिळून या शाळेत एकूण ५ शिक्षक पदे मंजूर आहेत. शाळा व्यवस्थापन समिती वपालकांच्या मागणी व पाठपुराव्यानंतर रिक्त असलेले एक उपशिक्षक पद भरले होते. परंतु, नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या त्या शिक्षकाला शिक्षण विभागाकडून त्याच दिवशी काही तासांतच मांडकुली शाळा नं. येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यानंतर पालकांनी या शिक्षकाला गोवेरी शाळेत पुन्हा कार्यरत ठेवावे, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली. निवेदन देऊन एक महिन्याच्या मुदतीत शिक्षक न मिळाल्यास शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांच्या मागणीबाबत शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. म्हणून पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गावडे, सरपंच दशरथ परब व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष मंगेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून शाळा बंद आंदोलन सुरू केले. पालक आपल्या मागणीवर ठाम असून आजही आंदोलन सुरू ठेवले. गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, या शाळेत मुख्याध्यापकासह चार शिक्षक पदे मंजूर आहेत. तेवढे शिक्षक त्या शाळेत सध्या आहेत. जे शिक्षक तात्पुरते कामगिरीवर दुसऱ्या शाळेत पाठविण्यात आले, त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करून कल्पना दिली होती, असे त्यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

