न्यायप्रविष्ट बाबीमध्ये उपोषणाचा इशारा अयोग्य !
*🟥 न्यायप्रविष्ट बाबीमध्ये उपोषणाचा इशारा अयोग्य !*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.२५*:-फोंडाघाट येथील शासकीय जमिनीमध्ये असलेले मंदिर एका व्यक्तीच्या नावे असल्याचे दिसून येत असल्याने याप्रकरणी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व नोंद रद्द करण्यासाठी काहींनी २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. याप्रकरणी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांजवळ याप्रकरणीची चौकशी प्रलंबित आहे. असे असताना उपोषणास बसण्याचा दिलेला इशारा हा न्यायीक कामकाजात हस्तक्षेप आहे. हा इशारा म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाला धमकी असून बेकायदेशीर व गैरपद्धतीचा वापर करून न्यायप्रविष्ठ गोष्टीत ढवळाढवळ केल्यासारखी आहे. तरी संबंधितांवर कारवाईची मागणी गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे फोंडाघाट येथील सुभाष सावंत, रामचंद्र सावंत वगैरे १८ जणांनी केली आहे. यात म्हटले आहे की, सदर देवस्थानप्रकरणी अनिल सावंत वगैरे ८ यांनी सन २००८ मध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्तांजवळ मंदिराचे धर्मादाय न्यास स्थापीत व्हावा म्हणून अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला प्रदीप लाड व इतरांनी हरकत घेतली आहे. हा चौकशी अर्ज धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. तर प्रदीप लाड यांनी सन २०१० मध्ये देवस्थानाबाबत धर्मादाय न्यास स्थापन होण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्याला अनिल सावंत यांनी हरकत घेतल्याने हाही अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. तसेच अन्य एका कुलमुख्यत्यारानेही न्यास स्थापित होण्यासाठी २०१७ मध्ये स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्यालाही हरकत घेतलेली असून हा अर्जही प्रलंबित आहे. न्यायालयीन कामकाज प्रलंबित असताना उपोषणाचा मार्ग अवलंबविणे व त्याद्वारे प्रशासनावर दबाव टाकणे असंविधानिय आहे. तरी याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_