कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्री स्वामी समर्थ पालखीचे बांदा येथे स्वागत..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२१:- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट यांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात य़ेणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे शनिवारी बांदा येथे स्वागत करण्यात आले.बांदा येथिल विठ्ठल मंदिरात सकाळी 9 वाजता पालखीचे आगमन झाले.यावेळी उमेश मयेकर व उमांगी मयेकर या दांपत्याने पादुकांचे पुजन केले.त्यानंतर आरती होऊन शिराप्रसाद वाटण्यात आला.यावेळी स्वामीभक्तांनी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.त्यानंतर पालखीचे पुढे घारपी येथिल श्री स्वामी समर्थ मठाकडे प्रस्थान झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!