महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 आदित्य ठाकरेंना धक्का! सुरज चव्हाण यांना अटक, महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-१८:- मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत, तसेच ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे

 

खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?

 

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत 100 कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे.

 

 

कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं.

सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.

 

खिचडी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

 

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कथित बॉडी बॅग प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी इडीने अनेकांची चौकशी केली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!