बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१८:- अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आल्याची माहीती आयोजनप्रमुख बांद्यातील ज्येष्ठ भजनकर्मी गिरिश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी दिली.
सोमवार दि.22 रोजी श्री विठ्ठल मंदिरात सकाळी नित्यपुजा होऊन प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पुजन होईल.11 वाजता नामस्मरण व घंटानाद होईल.सायंकाळी 6 वाजता श्रीराम जय जय राम जयजय राम या मंत्राचा 5 माळा जप होईल.ठिक 7 वाजता सायंआरती होईल.त्यानंतर द्वादशीचे भजन करण्यात येईल. मंगळवारी सकाळी 9 वाजता श्री रामाचे नामस्मरण करत सर्व भजनकर्मी व रामभक्तांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करण्यात येईल.त्यानंतर श्री हनुमान मंदिरात श्रीरामनामाचा जयजयकार करण्यात येईल. त्यानंतर सर्वजण बांद्यातील संत सोहिरोबानाथ आंबिये मठात जमून अभंग,नामस्मरण व आरती करतील व परत विठ्ठल मंदिरात येऊन या सोहळ्याची सांगता होईल.या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमात सर्व भजनकर्मी,श्रावणी रामजपाचे सदस्य,महिला भजनकर्मी,ग्रामस्थ व रामभक्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन गिरिश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी केले आहे. योगायोगाने मंदिरात शनिवारी श्री स्वामी समर्थ पालखी,रविवारी एकादशी व त्यानंतर दोन दिवस हा प्रभु रामचंद्रांचा कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस भाविकांना पर्वणी आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

