कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

‘क्षितिज वेल्थ’ कंपनीकडून जिल्हयात फसवणूक

*🟥’क्षितिज वेल्थ’ कंपनीकडून जिल्हयात फसवणूक*

*🟥ठेवीदारांनी तक्रार दाखल करावी, पोलिसांचे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१६*:-क्षितिज वेल्थ मॅनेजमेंट एलएलपी या कंपनीत वेगवेगळ्या स्किम व गुंतवणुकी नंतर भरमसाठ परतावा मिळेल, असे सांगून ठेवीदारांची फसवणूक झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील ठेवीदारांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.या कंपनीच्या सावंतवाडीतील एजंटांविरोधात सावंतवाडी येथील ठेवीदाराने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कंपनीचे चिपळूण येथील संशयित नितीन सुभाष कमलाकर (४४), गौरी नितीन कमलाकर (३७) यांच्यासह एजंट संशयित रिया रवींद्र तेली (४३) व तिचा पती रवींद्र रामचंद्र तेली (४८, दोन्ही रा. सावंतवाडी) तसेच किरण रामचंद्र तेली (५४, रा. चिपळूण) या पाच संशयितांविधोत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी रिया तेली, रवींद्र तेली व किरण तेली या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, अशी माहिती तपासी अधिकारी उपनिरीक्षक गजानन भालेराव यांनी दिली.या गुन्हयाचा तपास सुरू असताना जिल्हयात बऱ्याच ठेवीदारांनी आपल्या एजंट मार्फत क्षितिज वेल्थ मॅनेजमेंट एलएलपी या कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. यात त्यांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. संशयित पाचजणांकडून अशाप्रकारची फसवणूक झालेल्या जिल्हयातील गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह समक्ष सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.सावंतवाडीतील अर्चना गुरुनाथ खोबरेकर यांनी सदर कंपनीकडून व एजंटकडून आपली फसवणूक झाल्याची फिर्याद १६ सप्टेंबरला सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. चिपळूण येथील संशयित नितीन कमलाकर व गौरी कमलाकर यांनी क्षितिज वेल्थ मॅनेजमेंट एलएलपी या नावाची कंपनी सुरू करून त्याव्दारे गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. वेगवेगळ्या गुंतवणूक स्किम मध्ये ठेवीच्या स्वरुपात पैसे गुंतविल्यास भरमसाठ परतावा मिळेल, अशी पत्रके वितरित केली. एजंट नेमून आमिष दाखवून गुतवणूकदारांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा तसेच कंपनीत गुंतविलेले मुद्दल परत न देता फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच सदर कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!