कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥सावंतवाडीतील ‘जॉब फेअर’ नोंदणीला मोठा प्रतिसाद

🟥 सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या रोजगार मेळाव्याला हजेरी लावून नोकरीची संधी घ्यावी ; भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे आवाहन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.११: भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘जॉब फेअर साठी जवळपास आठ ते नऊ हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी युवकांचा प्रतिसाद वाढत आहे. शुक्रवार १२ जानेवारीला सकाळी ७ वाजल्यापासून रोजगार मेळाव्याला सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुरुवात होणार आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही ते थेट सकाळी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहू शकतात. जे प्रथम रोजगार मेळाव्याला उपस्थित राहतील, त्यांना तात्काळ जॉब कार्ड दिले जाईल. रोजगार मेळाव्यासाठी जवळपास शंभरहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या रोजगार मेळाव्याला हजेरी लावून नोकरीची संधी घ्यावी, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले आहे.नोकरीची ही संधी दवडू नका. तुमच्या दारात ही नोकरीची संधी आली आहे. नामांकित कंपनीत तुमच्या दर्जानुसार तुम्हाला नोकरी मिळणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी करावी. तसेच उमेदवार थेट मेळाव्याच्या ठिकाणीही उपस्थित राहू शकतात. जवळपास १० हजाराहून अधिक युवक-युवतींना थेट कंपन्यांमध्ये रोजगार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गोवा, मुंबई, पुण्यातील कंपन्याचा यात समावेश आहे, असे भाजप युवा मोर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून १२ जानेवारीला सावंतवाडी जिमखाना मैदानावर हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी तब्बल शंभरहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात टाटा मोटर्स, महिंद्रा,वेलनेस स्टार,आयसीआयसीआय बँक अशा अनेक कंपन्यांसह पंचतारांकित हों टेल्सचा समावेश आहे. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ प्लेसमेंट लेटर ट्रेण्यात येणार आहे. तर उर्वरित लोकांना जॉब कार्ड देण्यात येणार आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!