कट्टा येथे भरले जुन्या नाणी नोटांचे भव्य प्रदर्शन !*
*🟥कट्टा येथे भरले जुन्या नाणी नोटांचे भव्य प्रदर्शन !*
*🟥’माझी शाळा माझा उपक्रम’ अंतर्गत प्राचीन नाणी ,नोटांचे आपल्या छंदातून भरवले प्रदर्शन.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१०*:अनेकदा नाणेशास्त्र हे जुनी नाणी गोळा करण्याचा छंद मानला जातो. या शास्त्रात कोणत्याही माध्यमाचा वापर बाराबलुतेदार पद्धती नुसार लोकांद्वारे पैसा म्हणून केला जात होता. अनेक वस्तू अशा कवडी, शिंपले, मौल्यवान धातू आणि रत्ने अनेक शतके वापरली गेली आहेत. या शास्त्राच्या आधाराने आर्थिक विकास आणि ऐतिहासिक समाजाचे आकलन या प्रमुख बाबी प्रकाशात येत असल्याने नाण्याला महत्त्व होते. असेच एक प्रदर्शन कट्टा येथे भरवून त्याचा लाभ अनेक विद्यार्थी व पालकांनी घेतला.मु.पो.तेंडोली येथील श्री आदेश बर्डे यांनी गेल्या २५ वर्षांपासून जुनी नाणी नोटा व टपाल तिकीटे जमा केली असून त्यात इ. स. पूर्व २०० पासून ते आजपर्यंत विविध राजवटींचा त्यात समावेश आहे. त्यात मौर्य, सातवाहन, पश्चिमी क्षेत्रे, इन्डोग्रीक, मोघल, डच इंडीया, फ्रेंच इंडीया, पोर्तुगीज इंडीया,ब्रिटिश इंडीया, स्वतंत्र भारत, विदेशी चलन (नाणी) १८९० पासून पोस्टाची तिकिटे, जुने दस्ताऐवज इत्यादी एकाच ठिकाणी विद्यार्थी व पालकांनी पाहीले. अशा या सामाजिक उपक्रमाचे,”माझी शाळा माझा उपक्रम” अंतर्गत प्राचीन ऐतिहासिक नाणी नोटा व टपाल तिकिटे प्रदर्शनाचे उद्धघाटन वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे डॉ सोमनाथ परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी क.पं.शि.प्र. मंडळाचे उपाध्यक्ष श्री शेखर पेणकर, उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर, सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई ,शालेय समिती चेअरमन श्री सुधीर वराडकर,श्री दिपक पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते.इ. स. पूर्व २०० ते आजपर्यंत विविध राजवटीत चलनी नाण्यात झालेले बदल पाहू शकता. त्यात मौर्यकाळ सातवाहन पश्चिमी क्षेत्रे, इन्डो ग्रिक, कुषाण साम्राज्य, नंद साम्राज्य, वाकाटका, चोल, चोला, गुप्त साम्राज्य, राष्ट्रकुट, विजयनगर, देवगिरी यादव, तसेच सुरी साम्राज्य, सुल्तान, मोघल साम्राज्याची व संस्थानिकाची नाणी, स्टॅम्प पेपर्स, ईस्ट इंडिया, ब्रिटीश इंडिया, फेन्च इंडिया, डच इंडिया, पोर्तुगीज इंडिया, स्वतंत्र भारताचे चलन व त्यात झालेले बदल, पेपर्स नोटा, विविध देशाचे चलन, पोस्टाची तिकिटे, भारतीय १८९० पासून पोष्टाची तिकीटे, मोडी लिपितील जुने दस्ताऐवज-पत्रे, जुने ग्रंथ, तोफेचे गोळे, शिवकालीन नाणी पाहायला मिळाली.यामध्ये खंड,देश, राज्य ,संस्थान याची संपूर्ण माहिती अभ्यासायला मिळाली.हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांच्या प्रेरणेतून व गणित विभाग प्रमुख श्री प्रकाश कानूरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी संस्थेचे विश्वस्त कर्नल श्री शिवानंद वराडकर यांनी शुभेच्छा दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_