शैक्षणिक

प्राध्यापिका सुमेधा सावळ यांना यावर्षीचा ‘राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार २०२४’ जाहीर

भारतीय महिला मंच आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व विविध जनसेवेच्या क्षेत्रात आदर्शवत कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील निवडक व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या वर्षासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका सुमेधा सावळ यांना यावर्षीचा ‘राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार २०२४’ जाहीर झालेला आहे. १४ जानेवारी रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या सहाव्या धम्म विचार साहित्य व संस्कृती संमेलनात सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमेधा सावळ यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलेले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यातही त्या सहभागी होत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल संस्थेने घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. याबद्दल सौ. सावळ यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, प्राचार्या माधवी सावंत, उपप्राचार्य प्रदीप देसाई, पर्यवेक्षक नंदकिशोर नाईक तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्गाच्या वतीने अभिनंदन होत आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!