🟥 जिल्ह्यात मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र..!
🟥 प्रसाद गावडे, आशिष सुभेदार व विनोद सांडव तर मनसे रस्ते आस्थापना इंजिनियर सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांचीही पक्षाला सोडचिट्ठी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सावंतवाडी, दि-३१:- मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व रस्ते आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेच्या या प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने जिल्ह्यात मनसेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या चारही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की,आपल्या विचारांनी प्रभावित होऊन पक्ष संघटनेत सहभागी होत पदाधिकारी म्हणून काम करत असताना पक्षाची ध्येय धोरणे, आंदोलने व मराठी अस्मिता जपण्यासाठीचे पक्षाने घेतलेले विविध उपक्रम अगदी प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक राबवून ते तन-मन-धन खर्च करून तळागाळापर्यंत पोहचवले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून कायम जनतेची भूमिका मांडत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अग्रक्रमाने केले. विविध विषयांवर आक्रमकपणे आंदोलने करून पिडीत जनतेला न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वर्षभराच्या कालावधीपासून पक्ष निरीक्षकांकडून द्वेष भावनेतून जे पक्षांतर्गत गटातटाचे गलिच्छ राजकारण चालू केले आहे व त्यातून झालेली पक्ष संघटनेची हानी पाहता पडत्या काळात कट्टर महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलेली निष्ठा “बडव्यांनी” पार धुळीस मिळवून टाकली आहे. पक्षात सक्रीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मागे-पुढे करणाऱ्या व मर्जी राखणाऱ्या तसेच विमानतळावर बॅगा उचलणाऱ्या हातात पक्ष संघटना देत उरली सुरली ताकद संपवण्याचा जणू विडाच काही “बडव्यांनी” उचलला आहे. जिल्ह्यात विविध गंभीर गुन्ह्यांखाली डागाळलेल्या चेहऱ्यांना पदे बहाल करून पक्षाची प्रतिमा मलिन केली गेली आहे हे उघड्या डोळ्यांनी आता पाहवत नाही.ज्या पक्षात कोणत्याही स्वार्थाशिवाय व पक्षाकडून कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना इतकी वर्षे तळमळीने काम केले त्या पक्ष संघटनेत काही नादान व स्वार्थी पदाधिकाऱ्यांकडून चालवला गेलेला बालिशपणा व मुजोरी ही भविष्यात संघटनेस हानिकारक ठरणार आहे. सन २००५ साली विठ्ठला भोवती जमलेल्या “ज्या” बडव्यांमुळे आपल्यावर बाळासाहेबांची साथ सोडून शिवसेना सोडायची पाळी आली ; दुर्दैवाने आज देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश महाराष्ट्र सैनिकांवर तीच वेळ आली आहे. मागील जवळपास तीन वर्षे आमच्या भावना पक्षाच्या नेत्यांमार्फत आपल्यापर्यंत पोहचवल्या खऱ्या, मात्र काही बडव्यांनी आपल्या भोवती असे काही “चक्रव्ह्यूह” बनवले आहे की आमच्यासारखे कित्येक अभिमन्यू त्यात धारातीर्थी पडले तरी ते चक्रव्ह्यूह भेदले जाणार नाही व या बडव्यांनी लावलेली संघटनेची वाट आपल्यापर्यंत पोहचवली जाणार नाही असे आम्हांस आता कळून चुकले आहे.असो, आपण मनसे पक्षात जी संधी दिलीत व त्यामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय पटलावर नावारूपास आलो त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आमचाही विठ्ठल बडव्यांनी घेरला गेला असल्यानेच ह्या मुजोरी कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आज रोजी राजीनामा देत आहोत असे नमूद करत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.दरम्यान यानंतर मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर काय भूमिका घेतात याची उत्सुकता लागली असून पुढील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी पक्षाला राम राम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

