जिल्ह्यात आढळले कोरोनाचे दोन नवीन रुग्ण
*🟥 जिल्ह्यात आढळले कोरोनाचे दोन नवीन रुग्ण*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी,दि-३०:-* कोरोना गेला म्हणत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कळसुली व हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत हे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही रुग्ण घरीच उपचार घेत असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने २०१९-२० मध्ये सर्वत्र थैमान घातले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ५६ हजार ९०५ रुग्ण आढळले होते. पैकी १५४८ जणाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसही आली. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे कोरोना संपल्यात जमा होता. मात्र, कोरोना पुन्हा डोकवर काढू पाहत आहे.गेल्याच महिन्यात दोडामार्ग पाल येथे कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचा एक रुग्ण आढळला होता. मात्र, सुदैवाने हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला आहे. आता नव्याने दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, हे रुग्ण नव्या व्हेरिएन्टचे नाहीत असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आणि कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांअतर्गत कोरोनाचे दोन रुग्ण आढळलेले आहेत. दोन्ही रुग्ण घरीच उपचार घेत आहेत व दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क होत घरोघरी सर्व्हे सुरु करण्यात येऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

