🟥 आम.नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेधच ; रमेश कदामांचा जोरदार हल्लाबोल
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-१४:- आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजा विरोधात केलेले वक्तव्य गंभीर आणि भयंकर आहे.समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आम्ही नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून त्यांच्या पक्षाने व नेत्यानी त्यांना समज देऊन रोखले पाहिजे,तसेच सरकारने देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.आशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष मुस्लिम समाजाच्या पाठी ठाम उभा असल्याचे देखील ते म्हणाले.
गरळ ओकण्याचे कारण काय?
पत्रकार परिषदेत रमेश कदम म्हणाले मुस्लिम समाज येथे आताच आलेला नाही.पिढ्यानपिढ्या हा समाज येथे शांततेत आणि एकोप्याने राहत आहे.हिंदूच्या सणामध्ये आनंदाने ते सामील होतात.आणि त्यांच्या सणामध्ये आम्ही देखील उत्साहाने सहभागी होतो.कोकणाला आणि महाराष्ट्राला तर हिंदू मुस्लिम ऐक्याची एक मोठी परंपरा आहे.मग आमदार नितेश राणेंना गरळ ओकण्याची गरजच काय.?नेमके त्यांना काय साद्य करायचे आहे.?असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ही धमकी नव्हे काय
मुस्लिम समाज रस्त्यावर आला तर परत जाणार नाही,हे नितेश राणेंचे वक्तव्य म्हणजे धमकी नव्हे का.?खुलेआम ते असे धमक्या देत असतील तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी.पण सरकार कोणतीच दखल घेतलेली नाही.आणि त्यांचा पक्ष व पक्ष नेते देखील या बाबत बोलत नाहीत.याचा अर्थ काय.?भाजप आणि सरकार त्यांना पाठीशी घालून आशा वक्तव्यांचे समर्थन तर करत नाही ना.!असा गंभीर आरोप देखील माजी आम.रमेश कदम यांनी यावेळी केला.
तर पंतप्रधानांना काय बोलावे
मुस्लिम समाजाबाबत जर इतका आकस असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त पगडी पाठवतात,त्यांना केक भरवतात त्यावेळी नितेश राणे का बोलत नाहीत.मग अशावेळी पंतप्रधानांना काय बोलायचे.?जर आमच्या लोकांवर पाकिस्तानात हल्ले होत असतील,त्यांना विनाकारण त्रास दिला जात असेल तर पंतप्रधान गप्प का.?केंद्र सरकार त्याचा जाब का विचारत नाही.?त्याचे आत्मपरीक्षण नितेश राणेंनी करून जरा स्वपक्षातील नेत्यांना विचारणा करावी,असा थेट हल्लाबोलच रमेश कदमांनी यावेळी केला.
तर ते लोकशाहीला घातक
आम.नितेश राणेंना भाजपने वेळीच रोखवे,सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी,नपेक्षा जर आज नितेश राणे बोलले उद्या आणखी कोण तयार होईल आणि असे वक्तव्य जर सातत्याने होत राहिले तर ते देशाला आणि येथील लोकशाहीला घातक ठरेल,मुस्लिम समाजच नव्हे तर कोणत्याही समाजाच्या बाबतीत असे वक्तव्य होऊ नये,त्यासाठीच आज सर्वप्रथम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही पुढे येऊन आवाज उठवला असून आशा वक्तव्यांचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे.असेही ते म्हणाले.
तर गीतेंना पाठिंबाच
अनंत गीतेंच्या उमेदवारी बाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले,राजकारणात काम करत असताना व्यक्ती मोठी नसते तर पक्ष मोठा असतो.त्यामुळे पक्षाने एखादा निर्णय घेतला तर कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन हे केलेच पाहिजे.आम्ही महाविकास आघाडीत आहोत.त्यामुळे आघाडी तर्फे जर लोकसभेची उमेदवारी अनंत गीतेंना मिळाली तर निश्चितपणे मी त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात फिरेन. मी देखील रायगड मतदारसंघात निवडणूक लढवलेली आहे.त्यामुळे अनंत गीतेंना त्याचा फायदा होईल असेही ते म्हणाले.
पक्षादेशाचे पालन करू
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाबाबत देखील रमेश कदमांनी उघडपणे मत व्यक्त केले.या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.ती आमच्याकडेच असावी असा आमचा आग्रह असेलच.पण पक्ष नेतृत्वाने जर ही जागा अन्य पक्षाला दिली आणि तसा आदेश आला तर निश्चितपणे पक्षाच्या आदेशाचे पालन करून त्या उमेदवाराला निवडून आणू. या जागेच्या बदल्यात कोणती जागा घ्यावी हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांचाच असेल,आशा शब्दात त्यांनी भूमिका जाहीर केली.
चौकट——-
तो आघाडीचा फराळ गोडच होता
दिवाळीत रमेश कदम आम.भास्कर जाधव यांच्या घरी फराळासाठी गेले होते.पत्रकारांनी याबाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले,तो महाविकास आघाडीचा फराळ होता.त्यामुळे तो गोडच होता.राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू,किंवा मित्र नसतो.आमची आघाडी आहे.त्यामुळे एकत्र आलो.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

