🟥फोर्टिफाईड तांदूळ आरोग्याला पोषकच
🟥नाशिकातील शिबिरात शुक्ला यांची स्पष्टोक्ती
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.११: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून देशात अॅनिमियामुक्त (Anemia) व आरोग्यदायी भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बॅलेसेमिया, सिकेल सेल (sickle cell) व अॅनिमिया या आजारांना संवेदनशील असंलेल्या लोकसंख्येला फोर्टिफाईड (Fortified Rice) तांदूळ वितरित करण्यात येत आहे. नागरिकांनी या तांदळाचा आपल्या आहारात समावेश करावा, असे आवाहन भारत सरकार, सार्वजनिक वितरण प्रणालीचे संचालक विवेक शुक्ला यांनी केले आहे. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ही
माहिती दिली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनात चॅलेसेमिया, सिकेल सेल व अॅनिमिया या आजारांना संवेदनशील असलेल्या लोकसंख्येला फोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्याबाबत शंकांचे निरसन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संचालक शुक्ला बोलत होते. नागरिकांच्या दैनंदिन आहारात पोषक तत्वांचा समावेश करण्यासाठी फोर्टिफाईड तांदळाची निर्मिती करण्यात आली आहे. हा तांदूळ शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आला असून लज्ज्ञ व्यक्ती व नामांकित संस्थांनी याला मान्यता दिली आहे. या शिबिरात भारतीय खाद्य मंडळ विभागाचे उपमहाप्रबंधक अर्धदीप रॉय, पार्थ फाऊंडेशनचे नीलेश गंगावरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. रेणुका मेंहदे व डॉ. हेमांगिनी गांधी यांनी बॅलेसेमिया, सिकेल सेल व अॅनिमिया या आजाराची माहिती देत काय खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती दिली. तसेच या आजाराचे रुग्ण, गर्भवती महिला व बालकांच्या दैनंदिन आहारात रानभाज्या, पालेभाज्या व पोषणयुक्त आहाराचा समावेश करावा, याबाबत आवाहनहीं केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

