अंगणवाडी सुपरवायझरनी दडपशाही करून संप चिघळवू नये
*🟥अंगणवाडी सुपरवायझरनी दडपशाही करून संप चिघळवू नये*
*🟥अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सेक्रेटरी कमल परुळेकर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.०८:* मानधनवाढ,पेन्शन, मुलांचे आहार दरात वाढ करणे इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २ लाख १० हजार अंगणवाडी सेविका,मिनी सेविका व मदतनीस ४डिसेबर पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत.मंत्री नामदार अदिती तटकरे यांनीही ५ डिसेंबरला कृती समितीला आयुक्त कार्यालयात बोलावून ऑनलाईन चर्चा केली त्यान्चा आग्रह होता की संप मागे घेतल्यावर बोलूयात.पण मागील अनेक अनुभव सांगून आपण त्यांना सांगीतले की आधी मानधनवाढीची घोषणा करा,मग संप मागे घेण्याचा विचार कृती समिती करेल.मंत्रीणबाईना संप लवकर मिटावा वाटतेय हे पण सकारात्मक घ्यायला हवे. पण जिल्ह्यातून सुपरवायझर,प्रकल्प अधिकारी मात्र विषेश नवीन नोकरीत गेलेल्या अंगणवाडी मदतनीसना रात्रीसुद्धा फोन करून तूमच्या कारवाई करू ,हजर व्हा अशा धमक्या देत आहेत.खरे तर किती कर्मचारी संपावर आहेत एवढीच माहीती त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोचवायच असते. अंगणवाडी कर्मचारी मानसेवी असल्यामुळेच त्यान्चेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा नियम(service Rules) अद्याप सरकारने तयारच केलेले नाहीत. म्हणून तर नेमणुकीची ऑर्डर महाराष्ट्रभर एकसारखी नाही.जिल्ह्यातही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तारखांना दिलेल्या ऑर्डरी एकसमान नाहीत.सेवा नियम तयार असते तर असे झाले नसते हे अंगणवाडी कर्मचारी यांनी लक्षात घ्यावे.गेले ४ वर्षे कूपोषण रोखण्यासाठी आहाराचे दर वाढवावेत तरच अन्नाचा दर्जा वाढेल हे शासनाला आम्ही वारंवार पटवून देत आहोत.ते न करता आता कूपोषण वाढण्याची भीती सरकारला वाटते, ३वर्षाचे स्थगितीनंतर अलिकडेच महाराष्ट्रात २० हजार नवीन मदतनीस नेमल्या गेल्यात.त्याना धमक्या देऊन संप फोडण्याचा प्रयत्न सुपरवायझरनी करू नये अशी आमची अपेक्षा आहे,कारण अंगणवाडीच्या अनेक लढ्यानंतरच सेविका या मानसेवी पदावरून सुपरवायझर या सरकारी नोकरीवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला व बहुसंख्य सेविका सुपरवायझर झाल्यात हे कसे विसरता येईल? असो.जर सेवा नियम शासनाने अधिकृतरीत्या अंगणवाडीसाठी सरकारने केले असतील ते जाहीर करा असे आमचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आवाहन आहे. दरम्यान नागपूरचा मोर्चा पोलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे ११ऐवजी १५ डिसेबरला होत आहे याची सर्वानीच दखल घ्यावी असे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

