चिपळूण संघ शाखा चिपळुणच्या वतीने कै.शिवाजीराव पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन..
▪️कोविड योद्धे शिक्षकांचा सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१६: संघ शाखा चिपळुणच्या वतीने शिक्षक नेते कै.शिवाजीराव पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन येथे साजरा करण्यात आला. शिक्षकांसाठी कै.शिवाजीराव पाटील अण्णांनी दिलेले योगदान स्मरणात ठेऊन त्यांच्या बद्दलची अनेक मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोविड १९ च्या दुष्टचक्रात शिक्षकांनी समाज रक्षणासाठी पुढाकार घेऊन आरोग्यसेवक, पोलीस मित्र, वाहतुक सहकारी, स्क्रीनिंग सेंटर आदी कामांत योगदान दिले. या शिक्षक बांधवांच्या गौरवशाली कार्याबद्दल समाज रक्षक सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी निमंत्रितांमध्ये मुख्याध्यापक संघटना तालुकाध्यक्ष फिरोज खान, पुरोगामी संघटना तालुकाध्यक्ष जगदीश कांबळे, शिक्षक समितीचे रविंद्र मोहिते, आफ्रोडचे अध्यक्ष लुकमान तडवी, केंद्रीय प्रमुख थोरे, मोरे सर, खडस मँडम यांचीही उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांनी मनोगतात कै. शिवाजी अण्णा पाटील यांनी शिक्षकांचा सन्मान उंचावण्यासाठी दिलेल्या धडाकेबाज कार्याला आलेलं फळ म्हणजे आजचा समाधान पावलेला शिक्षक, अशा आशयाचे विचार व्यक्त करुन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. तसेच सन्मान उपक्रमाचे कौतुक केले.
व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष विलास गुजर यांचे समवेत जिल्हा सरचिटणीस तथा तालुकाध्यक्ष दीपक मोने, मुख्याध्यापक संघटना तालुकाध्यक्ष फिरोज खान आदी मान्यवर उपस्थित होते.
कृष्णकांत डिके, विश्वास पाटगावकर, दीपक खाडे, अशोक गोरिवले, विनायक गुरव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम संपन्न झाला.
दीपक खाडे यांचे ओघवत्या शैलीतील खुमासदार सूत्रसंचालन, खान सर,बळीराम पाणिंद्रे, बाळकृष्ण काटदरे, किरण गोखले, विद्याधर गोगटे, शिंदे, शिसोदे, चव्हाण, लालछोटे, धापसे, प्रविण शिवतरकर,
प्रदीप पवार, विजय शिंदे बांधवांची मेहनत नवचैतन्य निर्माण करण्यास फलदायी ठरली.
तालुका सचिव प्रकाश गांधी यांनी कार्यक्रम प्रास्ताविक व आभार मानले.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

