सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव गुरुवारी ७ डिसेंबर ला
सावंतवाडी शहरातील संस्थान ची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली माठेवाड्यातील माठ्याची जत्रा गुरुवारी दि.०७ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे.
त्या दिवशी सकाळी धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे. सर्वांनी या माठ्याच्या जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजे खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे.

