कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

रिक्षा पार्किंगसाठी जागा कमी प्रमाणात राहिल्याने व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ येणार; कसाल रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

▪️हायवे व बांधकाम अधिकारी यांच्या कडून जागेची पाहणी करण्यात येईल; जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे आश्वासन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१५: मुंबई-गोवा महामार्गावर गेली ४० ते ५० वर्ष कसाल येथे असणारे ५० ते ६० रिक्षा स्टँड  येथील व्यवसायिक, चालक-मालक आपला रिक्षा व्यवसाय चालवून उदरनिर्वाह  व कुटुंबाचा गाडा तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडत होते. महामार्गामुळे या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने रिक्षा पार्किंगसाठी जागा कमी प्रमाणात राहिल्याने या रिक्षाचालक व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. हायवेच्या उर्वरित जागेत रिक्षा लावण्यास जागा मिळावी  याकरिता आज जिल्हाधिकारी  के. मंजूलक्ष्मी यांची कसाल रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने भेट घेतली असता जिल्हाधिकारी यांनी हायवे अधिकारी व बांधकाम अधिकारी यांच्या कडून जागेची पाहणी करण्यात येईल असे आश्वासन दिले. या वेळी कसाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

मुंबई-गोवा महामार्गावर  कसाल हे मुख्य बाजारपेठ गाव आहे. गेली तीस ते चाळीस वर्षे कसाल एस.टी. स्टॅन्डच्या परिसरात पंचक्रोशीतील नागरीक जनता कामानिमित्त ये-जा करत असतात. शाळा, कॉलेज, दवाखाने, बाजारपेठ व मुंबई, पुणे इतर जिल्ह्यात राज्यातून येथे येणारे-जाणारे  चाकरमानी तसेच मालवण शहराच्या दिशेने जाणारे  पर्यटक नागरिक याच कसाल गावात विश्रांतीसाठी थांबतात. कसाल एसटी स्टँड उतरत व पुढील प्रवासासाठी रिक्षाचा आधार घेत रिक्षाने प्रवास करीत असतात. मात्र, आता हायवे माहामार्गाच्या रुंदीकरणामुळे या ६० ते ७० रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. रिक्षा व्यवसाय सुरु असून जागा कमी झाली आहे. हायवे रुंदीकरणाच्या उर्वरित जागेत रिक्षा व्यवसायाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी, असे  जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने भेट घेत निवेदन देण्यात आले.

यावर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हायवे अधिकारी, बांधकाम अधिकारी यांचेमार्फत रिक्षा स्टँडच्या जागेबाबत पाहणी करू असे आश्वासन भेटी घेण्यासाठी आलेल्या रिक्षा व्यवसायिकांना दिले.

यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एन.डी. सावंत, उपाध्यक्ष रुपेश हिंदळेकर, सचिव शिवराम सावंत, सुनील आचरेकर, अशोक आचरेकर, दादा वनकर, दत्‍ताराम सावंत, संदीप राणे, नयन कसालकर आदी उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!