कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥वैभव नाईक यांच्यासह बाराजण निर्दोष मुक्त

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.०१: जिल्हयात मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव करून शिंदे गटाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत निषेध मोर्चा काढल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह बाराजणांची सावंतवाडी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. नीलिमा गावडे, अॅड. पंकज आपटे व अॅड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले. हा प्रकार २७ जून २०२२ रोजी घडला होता. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, याकरिता २७ जून ते ११ जुलै २०२२ या कालावधीत मनाई आदेश जारी केले होते. राजकीय घडामोडीत राज्यात शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण झाले. त्यात सावंतवाडीचे शिवसेनेचे नेते, माजी पालकमंत्री तथा सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात सामिल झाले. त्यांच्या विरोधात जिल्हयातील मूळ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) २७ जून २०२२ रोजी सावंतवाडी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत, रूपेश राऊळ, विक्रांत सावंत, चंद्रकांत कासार, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, गुणाजी गावडे, रिमेश चव्हाण, योगेश नाईक आदी शिवसैनिकांनी मनाई आदेशाचा भंग करून केसरकर यांच्या विरोधात घोषणा देत निषेध मोर्चा काढला होता. त्यानुसार पोलिसांनी बाराजणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची अंतिम सुनावणी सावंतवाडी न्यायालयात होऊन संशयितांच्या वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने या गुन्ह्यातील बाराजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!