🟥 दूरसंचारच्या कारभाराविरोधात पळसंब सरपंच, उपसरपंचांचे उपोषण..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴आचरा, दि-०१:- पळसंब ग्रामपंचायत येथे बीएसएनएल विरोधात गुरुवारी सुरु कलेलेउपोषण पळसंब सरपंच आणि ग्रामस्थ यांनी मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या विनंतीस मान देऊन दुपारनंतर मागे घेतल. यावेळी बीएसएनएल कडून मोबाईल वर पत्र पाठवून आवश्यक ती कार्यवाही वीस ते तीस दिवसात पूर्ण करुन देणार असल्याचे सागितले. पळसंब गावामध्ये गेले काही दिवस दूरसंचार विभागाच्या खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यां- चे प्रचंड हाल होत आहेत. गावात मनोरा असतानाही ‘रेंज ‘कार्यान्वित नसल्याने ग्रामपंचायत स्तरावरून वारंवार दूरसंचार विभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र दूरसंचार कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट सबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता समाधान- कारक उत्तरे दिली जात नसल्याने दूरसंचार विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले आहे, अशी माहिती सरपंच महेश वरक आणि उपसरपंच अविराज परब यांनी दिली. पळसंब गावात दूरसंचार विभागाचा मनोरा असतानाही रेंज येत नाही. परिणामी नागरिकांचे तसेच विद्याथ्यर्थ्यांचे तसेच इतर शेतकरी वर्ग व ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा करूनही रेंज सेवा सुरळीत सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने पळसंब ग्रामपंचायत कार्या- लयनजिक असलेल्या दूरसंचार मनोरा येथे सरपंच वरक व उपसरपंच परब यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच सुहास सावंत, दादा पुजारे, माजी सदस्य अरुण माने, पिंट्या सावंत, बाबू सावंत, अशोक सावंत वैभव सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या उपोषणाबाबत दूरसंचार विभागासह पोलिस यंत्रणेला कळविण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

