कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता..

🟥 तर दोडामार्ग तालुक्यात देखील रामचंद्र सावंत यांसह कही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१४:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जिल्ह्यात मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे.ठाकरे शिवसेनेत मोठ मोठ्या पदांवर असलेले पदाधिकारी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. यात जिल्ह्यतील ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांची कुडाळ येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची खात्रीदायक माहिती राजकीय सुत्रांनी दिली आहे.

यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील कही पदाधिकाऱ्यांचा सामावेश असून यामध्ये तळकट गावचे माजी सरपंच व विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र सावंत यांचा देखील सामावेश आहे.

सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आपण संदेश पारकर यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला मात्र गेली कित्येक वर्षे शिवसेनेत काम करून सुद्धा ठाकरे गटात आमची दखल घेतली जात नव्हती.त्यामुळे शेवटी जनतेच्या कामासाठी आम्हाला पुढचा मार्ग निवडावा लागत आहे असे त्यांनी सांगितले.

सावंत यांनी या अगोदर युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपजिल्हाध्यक्ष,कुडाळ नगरपालिका निवडणुकी वेळी पक्ष निरीक्षक,तसेच तळकट सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली आहे.तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे प्रयोग, तसेच काजू बागायतदार तसेच सुपारी बागायतदार यांना वेळोवेळी होणाऱ्या नुकसानाबाबत ते वेळोवेळी पाठपुरावा करत असतात.तसेच आरोग्य शिबिर,विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असे वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम ते राबवत असतात.मात्र आता ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत अद्याप पर्यंत त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

सावंत यांचे मंत्री दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे जवळीक संबंध आहेत.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!