कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवली येथे माऊली मित्रमंडळाने वसंत राणे यांचा केला सन्मान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-१३:- कणकवली येथील राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळाने देवदुताचा सन्मान केला. अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे राजु म्हापसेकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डा येथे कार्यरत असणारे वसंत शंकर राणे यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी वसंत शंकर राणे यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव साहेब यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थितीत राहुन वसंत शंकर राणे यांचा सत्कार केला. ते म्हणाले, शासकीय काम करत असताना बऱ्याच प्रसंगी जे योगदान आहे ते समाजाप्रती जी संधी मला भेटते. पटवर्धन चौकामध्ये एका महिलेचे प्राण वाचवुन सहकार्य कस करता येईल, या पध्दतीने एक नमुना दिलेला आहे.

संजय मालंडकर म्हणाले, आम्हाला वसंत शंकर राणे आणि जिल्हा उपरुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचारी वर्गाचा आम्हाला अभिमान वाटतो.

यावेळी माऊली मित्र मंडळाचे सदस्य, व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. उपस्थितीत सर्वांनी वसंत शंकर राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या. सुभाष उबाळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!