इन्स्टाग्राम अकाऊंट ‘ बाबत ‘स्कूल टिचर्स’ची पोलीस ठाण्यात धाव
इन्स्टाग्राम अकाऊंट ‘ बाबत ‘स्कूल टिचर्स’ची पोलीस ठाण्यात धाव
कणकवली
एका ‘स्कूल’च्या नावाने कुणीतरी ‘इन्स्टाग्राम अकाऊंट’ खोलल्याबाबत त्या ‘स्कूल’च्या ‘टिचर्स’नी सोमवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर ‘अकाऊंटवर चुकीचे असे काहीही घडलेले नाही. मात्र हे ‘स्कूल’चे अधिकृत ‘अकाऊंट’ नाही. परिणामी विद्यार्थी, पालक यांचाही
गैरसमज होऊ शकतो. तर या ‘अकाऊंट ‘धारकाकडून ‘स्कूल’च्या नावाचा वापर करून गैरप्रकार करण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे ‘टिचर्स’नी पोलिसांना सांगितले. सदरचा गुन्हा ‘सायबर क्राईम’शी संबंधित असल्याने तशी ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवा, असे पोलिसांनी ‘टिचर्स’ना सांगितले.

