कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

माडखोल ग्रामस्थांचे आजपासून उपोषण

*🟥माडखोल ग्रामस्थांचे आजपासून उपोषण*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.०७:* सावंतवाडी- बेळगाव राज्य मार्गादरम्यान माडखोल गावातील राज्य मार्गाचे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पडलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे पावसाळ्यात वाहन चालकांचे कंबरडेच मोडले. त्यानंतर संबंधित ठेकेदारासह अधिकारीवर्गाने पावसाळ्यानंतर रस्ता नूतनीकरणाचे काम हाती घेण्याची ग्वाही दिली. मात्र, पावसाळा संपूनही अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या रस्ताप्रश्नी माडखोलचे माजी सरपंच संजय लाड हे ग्रामस्थांसह मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून उपोषण छेडणार आहेत. दरम्यान, रस्त्याच्या या दयनीय अवस्थेला संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असून याबाबत अनेकवेळा लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांच्या बेजबाबदारपणा व नाकर्तेपणाचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे संबंधितांच्या असंवेदनशील कारभाराबाबत राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे भाजपचे आंबोली मंडळ तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी सांगितले. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आणि माडखोल गावातून जाणाऱ्या या राज्यमार्गाची सध्या अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात उखडले. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!