कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

कार्यकर्त्याच्या भेटीसाठी नीलेश राणेंनी गाठले दुचाकीने घर

*🟥कार्यकर्त्याच्या भेटीसाठी नीलेश राणेंनी गाठले दुचाकीने घर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०६:* कार्यकर्ते जपणारे नेतृत्व ही राणे कुटुंबाची असलेली ओळख नीलेश राणे यांच्या मालवण दौऱ्यात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही जवळून अनुभवली. माजी खासदार नीलेश राणे आणि कार्यकर्त्यांचे जीवाभावाचे नाते अनेक प्रसंगातून अनेकांनी अनुभवले आहे. असाच एक प्रसंग शनिवारी राणेंच्या मालवण दांडी दौऱ्यात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनुभवला. एका कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राणे दांडी भागात आले होते. रोजच्याप्रमाणे गाड्यांचा ताफा सोबत होता. मात्र, एका ठिकाणी अरूंद रस्त्यावरून गाड्यांचा ताफा पुढे जाण्यात अडचण होती. मात्र, कार्यकर्त्याला भेटायचेच आहे ही भावना असल्याने नीलेश राणे गाडीतून उतरले आणि आणि एका कार्यकर्त्याची दुचाकी स्वतः चालवित त्या कार्यकर्त्याच्या घरी निघाले. वाट अवघड होती, अरुंद होती. मात्र राणे ठाम होते. त्यांनी त्या कार्यकर्त्याचे घर गाठलेच कार्यकर्ते म्हणजे सर्वस्व मानून कार्यरत असलेले नीलेश राणे
हे नेतृत्व सर्वसामान्य जनतेत राहून सेवाकार्यात असते. ज्याने राणेंना जवळून अनुभवले तो प्रत्येकजण सांगेल हा माणूस हळवा आहे, कोणताही बडेजाव न करता, सर्वसामान्य जनतेसाठी सतत काम करणारा आहे. भाजप युतीच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकासकामे पोहोचवित असताना पक्ष मजबूत करताना राणे करत असलेले सेवाकार्य निश्चितच प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी आदर्श असेच आहे. आज एका कार्यकर्त्याच्या भेटीसाठी राणे दुचाकीने गेले खरे मात्र या दरम्यान त्यांनी अन्य एका कार्यकर्त्याला आपल्या मागे बसविले. हा अनुभवही त्या कार्यकर्त्यासाठी विशेष असाच ठरला. वाडी वस्तीवर फिरत असताना राणे यापूर्वी अनेक ठिकाणी पायपीट करत कार्यक्रम ठिकाणी पोहोचले आहेत. त्याच धर्तीवर आजचा अनुभव होता. आजही मालवण येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून अन्य एका कार्यक्रमाला त्यांना पोहोचायचे होते. मात्र कार्यकर्ता महत्वाचा ही त्यांची भावना प्रत्येकासाठी आपुलकीची ठरली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!