🟥 दाणोलीत पाच गावांची कॅन्डल मार्च रॅली, घोषणांनी परिसर दणाणून सोडला
🟥 युवकांनी डोक्यावर बर्फ व तोडांत साखर ठेवून आंदोलन करावे ; सीताराम गावडे
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०३:- काल रात्रो साडेसात वाजता देवसु ओवळीये, दाणोली ,सातोळी, केसरी, बावळट ,या गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कॅण्डल मार्च काढून जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा दिला,यावेळी सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी सह्याद्री पट्ट्यातून झालेला हा उठाव खरोखर प्रेरणादायी आहे, एक मराठा जागा झाला तर अख्ख शासन हलवू शकतो याचे उदाहरण मनोज जरांगे पाटील आहेत, त्यामुळे खेडोपाड्यातून उठाव होणे ही काळाची गरज आहे, आपण काढलेली कॅण्डल मार्च रॅली इतर गावांना प्रेरणा देईल असे उध्दगार काढले.
मराठा समाजाच्या मुलांनी कुठेही भरकटत न जाता डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे, गांधीजींनी घालून दिलेल्या सनदशीर मार्गाने आपले आंदोलन करावे, ब्रिटिशांना सुद्धा आपला देश सोडून जावे लागले एवढी ताकद अहिंसेमध्ये आहे,त्यामुळे हिंसा करून सर्व साध्य होते असे नाही,म्हणून नवयुवकांनी या लढ्यात शांततेच्या मार्गाने उतरून लढा यशस्वी करावा असे आवाहन यावेळी बोलताना केले.
दीपप्रज्वलन व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, व त्यानंतर कॅण्डल मार्च रॅली करण्यात आली,यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण सांगतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देऊन परिसर जाणून सोडला
यावेळी डाॅ लवु देऊ सावंत रवि परशुराम सावंत ,महादेव सिताराम सावंत ,धनेश खंडु सावंत ,गाेविंद आत्माराम सावंत ,राजेश मधुसुदन सावंत,सुरज धर्मेंद सावंत ,तारकेश वसंत सावंत ,अब्जु सावंत ,संभाजी सावंत पारपाेली ,भिकाजी लाड ,स्वनिल परब साताेळी उपसरपंच, अशाेक सावंत दाणाेली , गाववठण ,अमर सावंत, सुरज सावंत खालचीवाडी केतन सावंत, सुधीर रामचंद्र सावंत , सुनिल चंदाेजी सावंत, संताेष आप्पा सावंत, महेश मधुसुदन सावंत,सुनिल यशवंत सावंत , किशाेर मंगेश परब,हनुमंत यशवंत सावंत , चंदन अर्जुन सावंत,पंकज परब,राहुल गावडे, बाबल तळवणेकर साताेळी आदि उपस्थित होते, बावळाट तिठ्या जवळ कॅन्डल मार्च समाप्ती करण्यात आली.

