🟥 मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज इन्सुली च्या वतीने लॉंग मार्चचे आयोजन..
🟥 तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सावंतवाडी,दि.३१:-
मराठा समाज आरक्षणासाठी आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज इन्सुली च्या वतीने गुरुवार दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता इन्सुली ते सावंतवाडी असा लॉंग मार्च काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सावंतवाडी चे तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना इन्सुली सकल मराठा समाजाच्या वतीने आज याबाबत निवेदन देण्यात आले.
तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना सकल मराठा समाज इन्सुली चे अध्यक्ष नितीन राऊळ, उपाध्यक्ष विनोद गावकर, अशोक सावंत, अँड नीता गावडे , अँड कौस्तुभ गावडे, रघुवीर देऊलकर, सौ जागृती गावडे, न्हानू कानसे ,देव गावडे, रघुनाथ परब, संकेत चौकेकर, गजेंद्र कोठावळे, आप्पा सावंत, अनिल सावंत, हेमंत देसाई, मयूर चराठकर ,गंगाधर कोठावळे, मनोहर गावकर, बाळा बागवे , तुषार कोठावळे आदीं उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला इन्सुली सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे तसेच हा पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज इन्सुली च्या वतीने गुरुवार दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता इन्सुली ते सावंतवाडी तहसीलदार कार्यालय असा लॉंग मार्च काढण्यात येणार असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी मोती तलाव, माजगाव नाला मार्गे पागावाडी, आरटीओ नाका ते कोंडवाडा इन्सुली असा लॉंग मोर्चा समारोप होणार आहे. सदर लॉंग मार्च साठी मराठा समाजाच्या बांधवांनी आज तहसीलदार श्रीधर पाटील व पोलिसांना निवेदन दिले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

