तळेरे-गगनबावडा रस्त्यासाठी आज ठाकरे शिवसेनेची पदयात्रा
*🟥तळेरे-गगनबावडा रस्त्यासाठी आज ठाकरे शिवसेनेची पदयात्रा*
*जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती : करुळ ते नाधवडे पदयात्रा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.३०:* तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्याचा परिणाम वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्ता दुपदरीकरणाबाबत २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप कामाला सुरूवात नाही. म्हणूनच शासनाला जाग आणण्यासाठी उद्भव ठाकरे शिवसेनेतर्फे करूळ ते नाधवडे अशी पदयात्रा सोमवार, ३० ऑक्टोबरला सकाळी ९ वा. काढण्यात येत असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, रस्त्याची दुर्दशा झाल्याने त्याचा या मार्गावरील ऊस वाहतूक, चिरे, सिलिका मायनिंग वाहतूक, मालवाहतूक, जिल्ह्यात येऊ इच्छिणारे पर्यटक, मुंबईकर चाकरमानी अशा सर्वांवरच होत आहे. रस्त्यासाठी ११० कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. यापूर्वी शिवसेनेने रास्तारोको केला तेव्हा पावसाळ्यानंतर तात्काळ रस्ता कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, अद्यपही कामाला सुरूवात नसल्याने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. पदयात्रेचा प्रारंभ करूळ घाटपायथा येथून सकाळी ९ वा. होणार आहे. तेथून एडगांव, वैभववाडी, कोकिसरे फाटा, नापणे फाटा व पुढे नाधवडे अशी जवळपास २१ कि. मी. ची पदयात्रा असणार आहे. पदयात्रेत रस्याच्या दुर्दशेचीही पाहणी करण्यात येणार आहे.
*महाविकास आघाडीचे नेते होणार सहभागी*
पदयात्रेमध्ये पक्षाचे नेते तथा
खासदार विनायक राऊत, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, महिला, आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जान्हवी सावंत आदी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर असे महाविकास आघाडीचेही पदाधिकारी सहभागी होणार आहेत. शिवसेना, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जनतेनेही पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पारकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

