कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

अत्याचारप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी

अत्याचारप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी

कणकवली

२१ वर्षीय युवतीवर अत्याचार करणारा तिचा प्रियकर बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६, मूळ केळवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी व सध्या रा. नाद, ता. वैभववाडी) तसेच बाळकृष्ण याचे साथीदार व रिक्षाचालक शैलेश शांताराम तांबे (३४, दारुम) व गणेश प्रकाश गुरव (२०, शिरवली, ता. देवगड) अशा तिघांनाही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सदरची घटना १५ ऑक्टोबरला सायंकाळनंतर ते १६ ऑक्टोबरला पहाटे या कालावधीत घडली होती. युवतीने १९ ऑक्टोबरला सायंकाळनंतर फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही संशयितांना पहाटेच्या सुमारास अटक केली होती. त्यांना सुरुवातीला पाच दिवस व त्यानंतर एका दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!