कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

उपकेंद्रांतर्गत वीज ग्राहक मेळावे घेण्याचा निर्णय

उपकेंद्रांतर्गत वीज ग्राहक मेळावे घेण्याचा निर्णय

सावंतवाडी

जिल्ह्यात महावितरणच्या अंदाधुंदी आणि बेजबाबदार कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना आहे. याबाबत अनेकदा लक्ष वेधूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक सबस्टेशन अंतर्गत 7 वीज ग्राहकांचे मेळावे घेऊन वीज समस्या सोडविण्याचा ठराव घेऊन पहिला ग्राहक मेळावा बांदा येथे घेण्याचा निर्णय सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक बाळ तथा गणेश बोर्डेकर, सदस्य पुंडलिक दळवी (सावंतवाडी), समीर शिंदे (देवसू), नीलेश परब

आरोस), संजय कानसे- ( माजगाव ), संतोष तावडे (ओटवणे), समीर माधव (सरमळे), कृष्णा गवस, बसत सुभाष सावंत (कोनशी), सिद्धेश तेंडुलकर (मळगाव), रामचंद्र राऊळ (तळवडे), अनिल गोवेकर (धाकोरे), सदाशिव आळवे (कामळेवीर) आदी उपस्थित होते. गणेशोत्सवादरम्यान आणि नंतरच्या काळात सावंतवाडी शहरासह तालुक्यात अतिरिक्त प्रमाणात वीज खंडित होण्याचा प्रकार सुरू झाला असून महावितरणवर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येत आहे. महावितरणचे अधिकारी आश्वासने देतात. परंतु त्यांच्याकडून कृती घडत नसल्याने आतापर्यंत दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांकडून ग्राहक सेवेसाठी योग्य कार्यवाही करून घेण्यासाठी इन्सुली उपकेंद्रांतर्गत ग्राहकांच्या बांदा येथे होणाऱ्या पुढील बैठकीत कुडाळ येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या

व स्थानिक सहाय्यक अभियंता आदींच्या उपस्थितीत ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी वीज वितरणकडून कामात होणारी दिरंगाई, गावागावात कंत्राटी वायरम नच्या जीवावर चालणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लाईनमनची नियुक्ती करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. भविष्यात येणारे प्रीपेड मीटर हा ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय असून अनेक गावांमध्ये अजूनही यावी, इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध नसल्याने मीटरचे रिचार्ज संपल्यावर ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येईल. त्यामुळे ग्राहकांमध्ये याबाबत जागरुकता आणून प्रीपेड वीज मीटर निर्णयास कडाडून विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!