सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस
सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस
सावंतवाडी,
गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून ते चावा घेत असल्याचे समोर येत आहे. मात्र प्रशासनाने खबरदारी घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे.
जिल्हा परिषद प्रशासन, नगरपरिषद प्रशासनाने याबाबत खबरदारी म्हणून सर्व प्रथम नसबंदी ची मोहीम हाती घेतली पाहिजे तसेच पकड मोहीम राबविण्याची गरज आहे. शहर आणि ग्रामीण भागात भटक्या व पाळीव कुत्र्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे पाळीव व भटक्या कुत्र्यांचे लाड थांबवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे. सावंतवाडी शहरात भटक्या

